मुंबई - राज्यात आज (दि. 3 ऑक्टोबर) कोरोना 14 हजार 348 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. तर 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा 14 लाख 30 हजार 861 वर पोहचला असून मृतांचा एकुण आकडा 37 हजार 758 वर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.3 टक्के तर मृत्यूचा दर 2.64 टक्के इतका आहे.
राज्यभरातून आज 16 हजार 835 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. यामुळे आजपर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्यांचा एकुण आकडा 11 लाख 34 हजार 555 वर पोहोचला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.3 टक्के इतके आहे. राज्यात आज 278 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या मृतांचा आकडा 37 हजार 758 पोहोचला आहे. यामुळे राज्यातील मृत्यूदर 2.64 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 70 लाख 35 हजार 296 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 14 लाख 30 हजार 861 म्हणजेच 20.34 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 22 लाख 3 हजार व्यक्ती गृह विलगिकरणात तर 28 हजार 414 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. सध्या राज्यात 2 लाख 58 हजार 108 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज नोंद झालेल्या एकूण 278 मृत्यांपैकी 151 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 64 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 63 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे 64 मृत्यू ठाणे-14, सातारा -13, नागपूर-11, पुणे - 8, नाशिक - 4, जळगाव - 2, जालना - 2, कोल्हापूर - 2, सांगली - 2, वर्धा - 1, सोलापूर - 1, मुंबई - 1, रायगड - 1 आणि चंद्रपूर - 1, असे आहेत.
हेही वाचा - खूशखबर..! यूपीएससी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा