मुंबई : एसी लोकलमध्ये प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून गर्दीच्या वेळेत एसी सेवा पूर्ण क्षमतेने धावत आहेत. ( passengers traveled by AC local ) अनेक प्रवासी आता एसी लोकल सेवेला प्राधान्य देत आहेत. उल्लेखनीय आहे की, या आर्थिक वर्षात 27 ऑक्टोबर 2022 पर्यंत पश्चिम रेल्वेवर एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या 1 कोटी पेक्षा अधिक ओलांडली आहे. ( powerful service of Western Railway )
प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ : गेल्या काही महिन्यांत एसी लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. एप्रिल 2022 ते आत्तापर्यंत या आर्थिक वर्षात एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे 1.01 कोटी आहे. जी 2019-20 या आर्थिक वर्षाच्या संपूर्ण कालावधीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तुलनेत सुमारे 85 टक्के अधिक आहे. सध्या पश्चिम रेल्वे एकूण 1383 ईएमयू सेवांपैकी एकूण 79 एसी लोकल सेवा चालवत आहे ज्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एसी लोकल हा खास करून उन्हाळ्यात चांगला पर्याय : यासंदर्भात जितेंद्र शहा बांद्रा येथील प्रवासी नेहमी एसी लोकलने ये जा करतात. त्यांनी सांगितले की, एसी लोकल हा खास करून उन्हाळ्यात चांगला पर्याय आहे. पावसाळ्यात विशेष करून एसी लोकलची गरज भासत नाही मात्र पावसाळा वगळता इतर मोसमात अशी लोकल चांगला पर्याय आहे. तर पश्चिम रेल्वे खेळ जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी ई टीव्ही सोबत संवाद साधताना सांगितले की, पश्चिम रेल्वेने प्रयत्न केला अधिकाधिक प्रवासी असताना लोकांना प्रवास करावे म्हणून त्यामध्ये तुमचा अजून प्रयत्न सुरूच राहणार आहे. जनतेने देखील प्रतिसाद दिलेला आहे.