ETV Bharat / state

Assembly Monsoon Session : सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; विरोधी पक्षनेत्याशिवाय विरोधक सरकारला भिडणार

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. मुंबईतील विधानभवनातील आधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे. 17 जुलैपासून ते 14 ऑगस्टपर्यंत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपन्न होणार आहे. यंदाच्या अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेता पदावर एकमत झाले नसल्यामुळे विरोधी पक्षनेता कोण असणार याविषयी संभ्रम कायम आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
author img

By

Published : Jul 15, 2023, 5:17 PM IST

सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. हे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून ते 14 ऑगस्टपर्यंत संपन्न होणार आहे. अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे. यंदाच्या अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेता पदावर एकमत झाले नसल्यामुळे विरोधी पक्ष नेत्याविषयी संभ्रम कायम असल्याचे दिसत आहे.

बंडाचे पडसाद दिसतील : तीन आठवड्याचे अधिवेशन 17 जुलै पासून ते 14 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. एकंदरीत तीन आठवड्यांचे अधिवेशन असणार आहे.अधिवेशनाचा कालावधी हा 19 दिवसाचा असून प्रत्यक्ष 15 दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार आणि रविवार अशा सार्वजनिक सुट्ट्या असल्यामुळे चार दिवस अधिवेशनाचे कामकाज बंद असेल. दरम्यान एका वर्षापूर्वी शिवसेनेत बंड झाले होते. यामुळे राज्यात सत्तासंघर्ष उद्भवला होता, त्याचे पडसाद यापूर्वीच्या अधिवेशनांत दिसले होते. आता अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षात बंड केले आहे. यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात याचे पडसाद पाहायला मिळतील.

विरोधी पक्ष नेता कोण असणार : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार होते. तर विधान परिषद विरोधी पक्षनेते उद्धव ठाकरे शिवसेनेचे अंबादास दानवे होते. परंतु आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार शिंदे-फडणीस सरकारसोबत सत्तेत विराजमान झाले आहेत. यामुळे हे पद रिक्त झाले आहे. दरम्यान अधिवेशनाआधी काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेता कोण होणार कोणत्या पक्षाकडे हे पद असणार यावर अजून शिक्कामोर्तोब झालेले नाही. विरोधी पक्षनेत्याच्या निवडीला विधानसभेच्या अध्यक्षांची मान्यता आवश्यक असते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस फूट आणि संख्याबळाचा निर्णय होईपर्यंत विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता कोण यावरती आता चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान पक्षनिहाय आमदारांची संख्या काँग्रेसची जास्त असल्यामुळे विरोधी पक्षनेते पदी काँग्रेसचाच विरोधी पक्ष नेता बसेल, असा दावा काँग्रेसकडून केला गेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरोधी पक्ष नेते पद गमवू शकतो. विरोधी पक्ष नेता कोण याचे उत्तर अधिवेशनाची सुरुवात झाल्यानंतर समोर येईल, असे सांगितले जात आहे.

अविश्वास ठराव मागे घेणार : महाविकास आघाडी सरकारच्या काळात तात्कालीन विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता. या पावसाळी अधिवेशनात तो ठराव मागे घेतला जाणार आहे. ठराव मागे घेण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव वर्ष अभिनंदन ठराव या अधिवेशनात पहिल्या आठवड्यात पटलावर येऊ शकतो.

हेही वाचा -

  1. Privilege Motion Committee : विधानसभेत हक्कभंग समिती नेमली पण परिषदेत मुहूर्त मिळेना; 'हे' आहे कारण
  2. Fadnavis Returned from Delhi: देवेंद्र फडणवीस राजधानीतून उपराजधानीत परतले.. परंतु दिल्ली दौऱ्याचा सस्पेन्स कायम?
  3. Letter To Governor : एकनाथ शिंदे विधीमंडळ पक्षप्रमुखपदी कायम, बंडखोर आमदारांनी राज्यपालांना लिहिले पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.