ETV Bharat / state

परदेशी प्रवाशांना क्वारंटाईनची भीती दाखवून केली जाते पैशांची वसुली; खासदार गोपाळ शेट्टी यांचा आरोप

author img

By

Published : Aug 31, 2021, 1:39 AM IST

प्रवाशांना क्वारंटाईन करण्याच्या नावाखाली पैसे वसुली सुरू आहे. हा भ्रष्टाचार त्वरित बंद करावा व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे.

Gopal Shetty latest news
Gopal Shetty latest news

मुंबई - भारताबाहेरून येणाऱ्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल असला, तरी त्यांना क्वारंटाईन करण्याच्या नावाखाली पैसे वसुली सुरू आहे. हा भ्रष्टाचार त्वरित बंद करावा व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेकडे केली असल्याची माहिती भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली.

प्रतिक्रिया

बेकायदेशीररित्या केले जाते क्वारंटाईन -

आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तिकडे कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असल्याचा अहवाल असतानाही त्याला मुंबई महापालिकेचे अधिकारी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये क्वारंटाईन करणार होते. क्वारंटाईन व्हायचे नसल्यास त्या व्यक्तीकडून दहा हजार रुपये मागितले जात होते. याची माहिती मिळताच त्या व्यक्तीच्या आईने मुंबईतील भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांना पहाटे फोन केला होता. शेट्टी यांनी त्वरित विमानतळावर जाऊन त्या व्यक्तीची मदत करून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या क्वारंटाईन करण्यापासून वाचवले.

संस्थात्मक क्वारंटाईन बंद -

या प्रकाराबाबत खासदार शेट्टी यांनी पालिका मुख्यालयात येऊन अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भारताबाहेरून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याबाबत केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये परिपत्रक काढले आहे. त्याच संदर्भातील परिपत्रक राज्य सरकारने सात महिन्यांनी 27 ऑगस्टला काढले आहे. याची अंमलबजावणी पालिकेकडून केली जात नसल्याने प्रवाशांची फसवणूक होत आहे. तसेच पालिका अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याची तक्रार खासदार शेट्टी यांनी केली. त्याची दखल घेऊन पालिकेने संस्थात्मक क्वारेंटाईन केले जाणार नाही, असा निर्णय घेतल्याची माहिती खासदार शेट्टी यांनी दिली.

'सात महिने राज्य सरकार झोपले' -

केंद्र सरकारने १७ फेब्रुवारी २०२१ ला परिपत्रक काढून परदेशातून म्हणजेच मिडल ईस्ट, साऊथ अफ्रिका, युरोपमधून आलेल्या प्रवाशांव्यतिरीक्त इतर देशांतून आलेल्या प्रवाशांना कोविड आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट असल्यास अडवण्याची गरज नाही, असे स्पष्टपणे म्हटले होते. मात्र, १७ फेब्रुवारीपासून आजपर्यंत अनेक प्रवाशांना विनाकारण संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. विमानतळावर परदेशातून आलेल्या प्रवाशांना भीती दाखवून अधिकाऱ्यांकडून अडवणूक करण्यात आली आहे. याबाबत २७ ऑगस्ट २०२१ ला राज्य सरकारनेही या केंद्र सरकारच्या परिपत्रकानुसार निर्देश दिले आहे. तब्बल ७ महिने राज्यात केंद्राचे परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना पाळल्या गेल्या नाही, असा आरोपही शेट्टी यांनी केला.

हेही वाचा- बॉलीवुड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची ईडीकडून सलग पाच तास चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.