ETV Bharat / state

मुंबईत लाखो रुपयांचे महागडे लॅपटॉप, मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक - mumbai police

शिवडी परिसरात घडला असता पोलीस तपासात शहरात महागडे लॅपटॉप चोरणारे आरोपी पोलिसांच्या हाती लागले. यात एकूण 7 गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींकडून एकूण 8 लाख रुपयांचे मोबाईल, लॅपटॉप हस्तगत करण्यात आले.

मुंबईत लाखो रुपयांचे महागडे लॅपटॉप, मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक
author img

By

Published : Jun 10, 2019, 3:04 PM IST

मुंबई - विविध परिसरात रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून महागडे लॅपटॉप, मोबाईल चोरण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यात वाढ झाली होती. असाच एक प्रकार शिवडी परिसरात घडला असता पोलीस तपासात शहरात महागडे लॅपटॉप चोरणारे आरोपी पोलिसांच्या हाती लागले. यात एकूण 7 गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींकडून एकूण 8 लाख रुपयांचे मोबाईल, लॅपटॉप हस्तगत करण्यात आले असून या टोळीतील इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

मुंबईत लाखो रुपयांचे महागडे लॅपटॉप, मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक

शिवडी परिसरात अशाच प्रकारची घटना ८ जूनच्या दिवशी घडली असून या प्रकरणातील पीडित तक्रारदार जावेद मोनुद्दीन यांच्या वाहनातून तब्बल 1 लाख 40 हजारांचा लॅपटॉप, मोबाईल, आयपॉड चोरीस गेले होते. या संदर्भात शिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीवी फुटेज व खबऱ्यांच्या गुप्त माहितीवरून लोअर परेल परिसरातून सोनू बनिया कुमार (27) यास अटक केली. यात या चोराने गेल्या काही महिन्यात मालाड, विपी रोड, भायखळा या परिसरातून तब्बल 3 लाख 26 हजार रुपयांचे लॅपटॉप वाहनातून चोरल्याचे तपासत उघड झाले आहे.

आरोपी सोनू बनियाकडून मिळालेल्या माहितीवरून, पोलिसांनी कुर्ला परिसरातून सुनील राजपूत (27) यालादेखील अटक केली असता या आरोपीकडून तब्बल 3 लाख 96 हजारांचे मोबाईल, लॅपटॉप हस्तगत केले आहेत.

Intro:मुंबईतील विविध परिसरात रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून महागडे लॅपटॉप , मोबाईल चोरण्याचा घटनांमध्ये गेल्या काही महिन्यात वाढ झाली होती. असाच एक प्रकार शिवडी परिसरात घडला असता पोलीस तापासत मुंबई शहरात महागडे लॅपटॉप चोरणारे आरोपी पोलिसांच्या हाती लागले असून एकूण 7 गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींकडून एकूण 8 लाख रुपयांचे मोबाईल, लॅपटॉप हस्तगत करण्यात आले असून या टोळीतील इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
Body:शिवडी परिसरात अशाच प्रकारची घटना ८ जून च्या दिवशी घडली असून या प्रकरणातील पीडित तक्रारदार जावेद मोनुद्दीन यांच्या वाहनातून तब्बल 1 लाख 40 हजारांचा लॅपटॉप, मोबाईल , आयपॉड चोरीस गेले होते. या संदर्भात शिवडी पोलोस ठाण्यात गुन्हा नोंदविला असता पोलिसांनी परिसरातील सीसीटीवी फुटेज व खबऱ्यांच्या गुप माहितीवरून मुंबईतील लोअर परेल परिसरातून सोनू बनिया कुमार (27) यास अटक केली असता या सराईत चोराने गेल्या काही महिन्यात मुंबईतील मालाड , वि पी रोड , भायखळा या परिसरातून तब्बल 3 लाख 26 हजार रुपयांचे लॅपटॉप वाहनातून चोरल्याचे तापासत उघड झाले आहे. Conclusion:आरोपी सोनू बनिया कडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कुर्ला परिसरातून सुनील राजपुत ( 27) या अटक केली असता या आरोपीकडून तब्बल 3 लाख 96 हजारांचे मोबाईल , लॅपटॉप हस्तगत केले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.