नवी मुंबई: नवी मुंबईतील नेरुळ येथील डी वाय पाटील हॉस्पिटल (DY Patil Hospital) मध्ये नोकरी मिळावी म्हणून एका गरीब गरजू महिलेने अर्ज केला होता. या नोकरीच्या बदल्यात डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत व्यक्तीने या असाह्य महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली.
नोकरीच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केल्याने संबंधित महिला चिडली. तीने या विरोधात मनसेच्या बाळसाहेब शिंदे यांच्याकडे कैफियत मांडली. संबंधित व्यक्ती त्या महिलेला वारंवार फोन करून दबाव टाकत होता. माझी पत्नी नसल्याने नोकरीच्या बदल्यात शरीरसुख दे अशी मागणी तो वारंवार करत होता. पीडित महिलेला स्विय सहाय्यक म्हणून काम देण्याचे आमिष दाखवून वाशी येथील लॉज मध्ये बोलवले. शरीर संबंध ठेवण्यासाठी महिलेला वाशी येथील लॉज वर बोलावले या लॉजवर हा नराधमाला आला असता, मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहाथ पकडुन चांगलाच चोप दिला यानंतर पोलिसांना बोलवून पोलिसांच्या ताब्यात दिले.