ETV Bharat / state

MNS on Seema Haidar Film : 'मनसे'ची सीमा हैदरच्या चित्रपटाबाबत धमकी; निर्मात्याची उच्च न्यायालयात धाव

देशभर चर्चा असलेल्या सीमा हैदर (film on Seema Haider case) आणि सचिन यांच्या विवाहबाबतची घटना आता चित्रपटापर्यंत पोहोचली आहे. त्यावर तयार होणाऱ्या चित्रपटाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS threatens filmmaker) वतीने धमकी दिल्या प्रकरणी निर्माता अमित जानी (filmmaker Amit Jani) यांनी 'कराची टू नोएडा' (Karachi to Noida movie) या चित्रपटाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. क्रिमिनल रिट पिटीशन याचिका करत चित्रपटाला संरक्षण देण्याची मागणी त्यात केली गेलेली आहे. (film Producer run to Mumbai HC)

MNS Threatens Filmmaker
मुंबई हायकोर्ट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 6:24 PM IST

Updated : Aug 27, 2023, 6:47 PM IST

मुंबई: पाकिस्तान येथील कराची शहरामधील राहणारी सीमा हैदर (film on Seema Haider case) नेपाळला येते. नेपाळ मार्गे भारतात येते आणि सचिन या उत्तर प्रदेश मधल्या तरुणासोबत तिचं प्रेम होतं. त्यांचा पुढे विवाह देखील होतो. यामागे अनेक आरोप-प्रत्यारोप होऊन गेल्या महिनाभरात प्रचंड चर्चा समाज माध्यमांवर सुरू झालेली आहे. (MNS threatens filmmaker) आता त्यावर निर्माता अमित जानी (filmmaker Amit Jani) यांनी 'कराची टू नोएडा' (Karachi to Noida movie) हा चित्रपट बनवण्याला सुरुवात केलेली आहे. या चित्रपटाला प्रसारित करण्याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हा हिंदू विरोधी चित्रपट असल्यामुळे त्याला विरोध केला गेलेला आहे. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा दावा चुकीचा असल्यामुळे गुन्हेगारी स्वरूपाची याचिका मुंबई उच्च न्यायालयात निर्माता अमित जानी यांनी दाखल केलेली आहे. (film Producer run to Mumbai HC)

चित्रपट हिंदू विरोधी? "जानी फायरफॉक्स" या मोठ्या बॅनरच्या वतीने सीमा हैदर आणि सचिन यांच्या जीवनावरील हा चित्रपट अमित जानी यांनी तयार केलेला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध केला गेलेला आहे. कारण यामध्ये हिंदू विरोधी अशा पद्धतीच्या भावना दाखवण्यात आल्याचे मनसेचे म्हणणे आहे, असे अमित जानी यांनी याचिकेमध्ये म्हटले आहे.

भावना दुखावण्याचा हेतू नाही: मनसेच्या दाव्याला चूक ठरवत निर्माता अमित जानी यांनी म्हटलेलं आहे की, आमचा हा चित्रपट देशभक्ती आणि राष्ट्रवाद यांनी भरलेला आहे. त्याच्यामुळे मराठी भावनांना दुखावण्याचा किंवा हिंदू भावनांना दुखावण्याचा प्रश्न त्यामध्ये येतच नाही. म्हणूनच ही कुणाच्याही भावना न दुखणारी अशी ही फिल्म आहे. त्यामुळे फिल्म उद्योगाचे नुकसान होऊ नये म्हणून याबाबत न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी अमित जानी यांनी निर्माता म्हणून याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात मागणी केलेली आहे.

काय आहे चित्रपटाची पार्श्वभूमी: चित्रपटाची पार्श्वभूमी अशी आहे की, सीमा हैदर ही कराचीमध्ये राहत असताना इंटरनेटद्वारे पब्जी खेळ खेळत असताना भारतातल्या नोएडा मधील सचिन याच्याशी तिची ओळख होते. ती नेपाळ मार्गे भारतात येते आणि सचिन सोबत तिचा प्रेम विवाह होतो. या अत्यंत चमत्कारिक अशा कहाणीच्या आधारे फायरफॉक्स प्रोडक्शन हाऊसच्या वतीने 'कराची टू नोएडा' हा चित्रपट तयार होत आहे. परंतु, चित्रपट हा हिंदू भावनांना दुखावणारा आहे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निर्माता अमित जानी यांना धमकी दिल्याचे त्यांनी म्हटलेलं आहे. पुढील आठवड्यामध्ये याबाबत याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

  1. Rakhi sawant first umrah video : राखी सावंत त्या व्हिडिओनंतर झाली ट्रोल, प्रेक्षक म्हणाले नाटक...
  2. Sidharth Malhotra And Kiara Advani : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्यानंतर प्रथमच सिद्धार्थ आणि कियारा दिसले एकत्र, पहा त्यांचा लूक
  3. Dream girl २ movie box office collection day २ :'ड्रीम गर्ल २ ' च्या पुजाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, किती केली कमाई?

Last Updated : Aug 27, 2023, 6:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.