ETV Bharat / state

पनवेल व नवी मुंबईत मनसेचा झटका मोर्चा; कार्यकर्ते रस्त्यावर - mns strike in navi mumbai for electricity

राज्यभरात विविध शहरात मनसेने वाढीव वीजबिलाविरोधात महामोर्चाचे आयोजन केले होते. पनवेल व नवी नवी मुंबईत मनसेने भव्य मोर्चा काढला.

navi mumbai mns strike
पनवेल व नवी मुंबईत मनसे
author img

By

Published : Nov 26, 2020, 3:16 PM IST

नवी मुंबई - वाढीव वीज बिलावरून मनसे आक्रमक झाली आहे. राज्यभरात विविध शहरात मनसेने वाढीव वीजबिलाविरोधात महामोर्चाचे आयोजन केले होते. पनवेल व नवी मुंबईत मनसेने भव्य मोर्चा काढला.
मनसे नेत्यांनी राज्यसरकारवर ओढले ताशेरे
मनसे नेत्यांनी राज्य सरकारवर प्रचंड तोंडसुख घेऊन ताशेरे ओढले. वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर मनसे आज राज्यभर आंदोलन करत आहे. नवी मुंबई व पनवेलमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली. मनसेच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला. त्याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठिकठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चाचे आयोजन केले आहे.

पनवेल व नवी मुंबईत मनसे
वाढीव बिल कमी करण्याची केली मागणी
लॉकडाऊन काळात राज्यातील नागरिकांना आलेले वाढीव वीज बिल माफ करा या मागणीसाठी मनसेने पनवेलच्या शिवाजी चौकात आंदोलन केले. पनवेल, नवी मुंबई व अनेक शहरांत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.