मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सभा गाजवत असताना त्यांचा एक महाराष्ट्र सैनिक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मनसेने अनेक स्टार प्रचारक नेत्यांची यादी दिली आहे. मात्र, विक्रोळी विधानसभेसाठी जयंत दांडेकर हेच स्टार प्रचारकाची भूमिका पार पडत आहे. उंची अवघी 3 फूट असलेले दांडेकर यांचा प्रचार मात्र लक्षवेधी ठरत आहे. त्यांची बोलण्याची शैली एक वेगळा अंदाज या मतदारसंघात प्रसिद्ध आहे. मी स्टार प्रचारक नाही. मी पक्षाचे काम करतो, असे जयंत दांडेकर सांगतात. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी.
हेही वाचा - 'मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केल्यास भारी पडेल'