मुंबई : महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेनुसार आणि तिथीनुसार अशी दोन वेळा साजरी केली जाते. त्याचप्रमाणे आज तिथीनुसार शिवजयंती मुंबईमध्ये साजरी करण्यात आली. शिवसेना आणि महाराष्ट्र निर्माण सेना हे पक्ष तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात. दादरच्या शिवाजी पार्क येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत ही शिवजयंती साजरी करण्यात आली.
काय म्हणाले राज ठाकरे : तिथीनुसार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला सोशल मीडियाद्वारे पोस्ट लिहित संबोधन केले आहे. आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. हिंदवी स्वराज्याची निर्मिती हे आपले जीवितकार्य आहे व आपण ह्या ईश्वरी इच्छेचे वहनकर्ते आहोत ह्याची पुरेपूर जाणीव असणारे आपले महाराज, त्याकाळी इस्लामी राजवटींच्या आक्रमणात हिंदू राजवटी धडाधड कोसळत होत्या, एखाद दुसरी घटना सोडली तर शतकानुशतके अस्वस्थ हिंदू मनांना उभारी देईल अशी एकही घटना घडत नव्हती. बरे, इस्लामी राजवटी जिंकत होत्या, तो विजय हा काही त्या संस्कृती फार विकसित किंवा सुसज्ज होत्या म्हणून होत नव्हता, असेही राज ठाकरे म्हणाले.
-
#छत्रपतीशिवाजीमहाराज #हिंदवी_स्वराज #ShivajiMaharaj pic.twitter.com/alHRvAQX4b
— Raj Thackeray (@RajThackeray) March 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#छत्रपतीशिवाजीमहाराज #हिंदवी_स्वराज #ShivajiMaharaj pic.twitter.com/alHRvAQX4b
— Raj Thackeray (@RajThackeray) March 10, 2023#छत्रपतीशिवाजीमहाराज #हिंदवी_स्वराज #ShivajiMaharaj pic.twitter.com/alHRvAQX4b
— Raj Thackeray (@RajThackeray) March 10, 2023
हिंदू एकजुटीचा निर्धार : या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की, त्या आपल्या देशावर राज्य करू शकल्या कारण आपण आत्ममग्न होतो. हिंदुधर्मीय म्हणून एकजूट नव्हतो. पण छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या कृतीमुळे ह्या खंडप्राय देशातील हिंदू मने पुन्हा ताठ उभी राहू लागली. देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवाजी महाराजांची जयगाथा घुमू लागली आणि 'हिंदवी स्वराज्य' हे आवाक्यातील स्वप्न आहे. हे हिंदू मनांना वाटू लागले. आज छत्रपतींच्या जयंतीदिनी आपण पुन्हा एकदा आत्ममग्न होत नाही आहोत ना?, हिंदू एकजुटीचा निर्धार कमी पडत नाहीये ना, हे पाहणं हेच महाराजांच्या कार्यास यथोचित अभिवादन ठरेल, असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
जयंतीनिमित्त ड्रोनच्या साह्याने पुष्पवृष्टी : दरम्यान, या शिवजयंतीचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट विभागाकडून आयोजन करण्यात आले होते. चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या शिवजयंतीचे आयोजन केले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर ड्रोनच्या साह्याने पुष्पवृष्टी देखील करण्यात आली.