ETV Bharat / state

ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर राज ठाकरे मुंबईत दाखल; विरोधी पक्षांची शुक्रवारी तातडीची बैठक - राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. भेटीनंतर राज ठाकरेंनी थेट सोनिया गांधी आणि आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांची आज भेट घेतली. आता राज ठाकरे मुंबईत परतले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे
author img

By

Published : Aug 1, 2019, 8:46 PM IST

Updated : Aug 1, 2019, 9:53 PM IST

मुंबई - कलकत्ता दौऱ्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत परतले आहे. त्यांनी राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची शुक्रवारी तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत ईव्हीएम विरोधात रॅली आणि आगामी निवडणुकीत पक्षाच्या रणनीतीबाबत राज ठाकरे आपले धोरण स्पष्ट करतील अशी माहिती आहे.

वांद्रे एमआयजी क्लब येथे शुक्रवारी ही बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार असून या पत्रकार परिषदेला सर्व विरोधक एकत्र येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

विरोधकांची लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमविरोधी भूमिका आणखी तीव्र झाली आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधी भूमिका अनेकवेळा जाहीर बोलून दाखवली आहे.

राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. भेटीनंतर राज ठाकरेंनी थेट सोनिया गांधी आणि आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांची आज भेट घेतली. आता राज ठाकरे मुंबईत परतले आहेत.

ईव्हीएम विरोधात देशव्यापी आंदोलन उभे राहण्याची गरज असल्याची भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती. यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीत ईव्हीएमवर बहिष्कार टाकणार की विरोधी पक्षाच्या आघाडीसोबत जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Intro:मुंबई - कलकत्ता दौऱ्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत परतलेत. त्यांनी राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत ईव्हीएम विरोधात रॅली आणि आगामी निवडणुकीत पक्षाची रणनीतीबाबत राज ठाकरे आपले धोरण स्पष्ट करतील अशी माहिती आहे.
वांद्रे एमआयजी क्लब येथे उद्या ही बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार असून या पत्रकार परिषदेला सर्व विरोधक एकत्र येणार असल्याची माहिती आहे. यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात , राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.Body:विरोधकांची लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमविरोधी भूमिका आणखी तीव्र झाली आहे.विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधी भूमिका अनेकवेळा जाहीर बोलून दाखवली आहे.
राज ठाकरे यांनी इव्हीएमच्या मुद्यावर केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. भेटीनंतर राज ठाकरेंनी थेट सोनिया गांधी व आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व यांची आज भेट घेऊन मुंबईत परतलेत.Conclusion:इव्हीएम विरोधात देशव्यापी आंदोलन उभे राहण्याची गरज असल्याची भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती. यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीत ईव्हीएम वर बहिष्कार टाकणार की विरोधी पक्षाच्या आघाडीसोबत जाणार हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे.
Last Updated : Aug 1, 2019, 9:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.