ETV Bharat / state

Maharashtra Assembly By Election: कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध कराव्यात, राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला केले आवाहन - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

भाजप आमदार मुक्ता टिळक व लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा पेठ व पिंपरी - चिंचवड या जागेवर २६ फेब्रुवारी रोजी पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार घोषित केले आहेत. महाविकास आघाडी सुद्धा ही निवडणूक लढण्यास पूर्ण तयारीत आहे. अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महविकास आघाडीला एक पत्र लिहिले आहे.

Maharashtra Assembly By Election
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
author img

By

Published : Feb 5, 2023, 12:31 PM IST

मुंबई : या पत्रातून राज ठाकरे यांनी कसबापेठ आणि पिंपरी - चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. तसेच राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीची आठवणही महाविकास आघाडीला करून दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा सल्ला महाविकास आघाडी मानणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात, अशी इच्छा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

राज ठाकरे यांचे महाविकास आघाडीला पत्र : महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांचे नुकतेच दुःखद निधन झाले. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूका पार पडत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचे निधन होते, तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला सुद्धा असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशा वेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणे ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजली ठरणार नाही का? असे त्यांनी मत व्यक्त केले.

Maharashtra Assembly By Election
राज ठाकरे यांचे महाविकास आघाडीला पत्र

निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन : ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनतेकडून देखील सहानभूती मिळण्याची शक्यता फार कमी आहे. अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या. त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. ज्यामुळे सकारात्मक प्रतिसाद मिळाला, ती निवडणूक बिनविरोध पार पडली.

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ : आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला, तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे. हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा, अशा मजकूराचे पत्र त्यांनी महाविकास आघाडीला पाठवले.

हेही वाचा : Kasba By Election: कसबा मतदार संघातील रखडलेली विकास कामे मार्गी लावणार- रवींद्र धंगेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.