मुंबई : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर दादरच्या शिवाजी पार्क येथे जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे हे रोज सकाळी मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी जात असतात. नेहमीच्या सवयीप्रमाणे संदीप देशपांडे हे आज देखील मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्कवर गेले असता त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. संदीप देशपांडे यांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच त्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यानी भेट घेतली आहे.
४ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल - याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्या तक्रारीवरुन शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 307, 506(2), 504, 34 सह क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट 7 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कसबे यांनी दिली आहे. संदीप देशपांडे यांचा जबाब शिवाजी पार्क पोलिसांनी नोंदवला असून, घटनास्थळी पोहचून पोलिसांनी पाहणी केली आहे. घटनास्थळानजीक असलेले सीसीटीव्ही यांची पडताळणी शिवाजी पार्क पोलीस करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचप्रमाणे आधीच धाबा धरून बसलेले हल्लेखोर यांनी चेहरा झाकला होता आणि क्रिकेट बॅट आणि स्टंप घेऊन बसले होते. संदीप देशपांडे यांच्या मॉर्निंग वॉकचा पहिला राऊंड हल्लेखोरांनी पाहिला. नंतर दुसऱ्या राउंड मारत असताना हल्ला चढवला. हल्लेखोर ३५ ते ४० वयोगटातील असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी पोलिसांना दिली.
राज ठाकरे, अमित ठाकरेंनी घेतली देशपांडेंची भेट -संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे या दोघांनी थेट हिंदुजा रुग्णालय गाठले. त्यांनी संदीप देशपांडे यांच्या तब्येतीची चौकशी केली. अशी माहिती मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांची भेट घेऊन त्यांना धीर दिल्याचे देखील मनसेच्या विश्वसनीय पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे अमित ठाकरे स्वतः गाडी चालवून रुग्णालयात दाखल झाले होते.
देशपांडे यांची प्रतिक्रिया - संदीप देशपांडे यांच्यावर दादरच्या शिवाजी पार्क येथे जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. संदीप देशपांडे हे रोज सकाळी मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी जात असतात. नेहमीच्या सवयीप्रमाणे संदीप देशपांडे हे आज देखील मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्कवर गेले असता त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून बाहेर येताच संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी असल्या भ्याड हल्ल्यांना घाबरत नाही. या हल्ल्यामागे कोण आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. ज्यांना वाटतेय या छोट्या हल्ल्याने मी घाबरेल त्यांनी काय ते समजून घ्यावे. असा घाबरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. अशांना मी भीक घालत नाही, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
गर्दी पाहून हल्लेखोर घाबरले : मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संदीप देशपांडे हे नेहमीच्या सवयीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी दादरच्या शिवाजी पार्कवर गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर काही अज्ञात त्यांनी स्टंप आणि रॉडच्या सहाय्याने हल्ला केला. हा अल्ला हल्ला इतका भयंकर होता की, उपस्थितांचे देखील भांबेरी उडाली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बेसावध संदीप देशपांडे यांना सुरुवातीला काही कळले नाही. मात्र, शिवाजी पार्क सकाळी अनेक जण योगा आणि जॉगिंगसाठी येत असतात या लोकांनी हा हल्ला झालेला पाहिला आणि त्यांनी मध्यस्थी केली. अचानक आलेली गर्दी पाहून हल्लेखोर घाबरले आणि त्यांनी तिथून पळ काढला.
हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार झाले : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात मिळालेली अधिक माहिती अशी की, संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या लोकांनी चेहऱ्यावर मास्क लावला होता. त्यामुळे त्यांचा चेहरा दिसला नाही. इथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी जेव्हा हा हल्ला झालेला पाहिला, त्यावेळी तात्काळ ते मदतीसाठी धावले आणि त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. देशपांडे यांना आता डिस्चार्ज मिळाला आहे.
घटना राजकीय वैमस्यातून झाल्याचा अंदाज : हल्लेखोर कोण होते याची काहीही माहिती मिळालेली नाही. हल्लेखोर हे तोंडाला मास्क लावून आले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटलेली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, ही घटना राजकीय वैमस्यातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे चिंताग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात.
मनसे आक्रमक - मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ नाशिकमधील मनसेसैनिक आक्रमक झाले आहेत. नाशिकच्या मनसे राजगड या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हल्लेखोरांना पकडा अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल अशा इशारा यावेळी देण्यात आला.