ETV Bharat / state

मनसे विधानसभा लढवणार; 5 तारखेपासून धडाडणार प्रचाराची तोफ;  राज ठाकरेंची घोषणा

मनसे विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केली. ५ तारखेपासून प्रचाराला सुरुवात होणार आहे. तसेच दोन दिवसात 'एबी' फॉर्मचे वाटप करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ आज धडाडणार
author img

By

Published : Sep 30, 2019, 7:41 AM IST

Updated : Sep 30, 2019, 11:38 PM IST

लाईव्ह अपडेट -

*

मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्रची मनसेच्या बैठकीला उपस्थिती

* नाशिकचे शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांचा पक्षाच्या राजीनाम्यानंतर मनसेत प्रवेश

मुंबई - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. युती आघाडीचे जागा वाटप आणि तिकीट वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना निवडणुकीच्या रणांगणात आज मनसेचे इंजिन धावताना दिसणार आहे. ईडीच्या कार्यालयातून आल्यापासून शांत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज धडाडणार आहे. वांद्र्याच्या एमआयजी क्लबमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला राज ठाकरे संबोधित करणार आहेत. मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आणि मनसेच्या इच्छुक उमेदवारांची यादी देखील या मेळाव्यात जाहीर होणार आहे.

मनसे विधानसभा लढवणार

आज सोमवार सकाळी 10.00 वाजता, एम.आय.जी क्लब, वांद्रे (पूर्व) येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाचे नेते, सरचिटणीस, सचिव, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व 'विधानसभा 2019 निवडणूकीच्या पक्षाच्या संभाव्य उमेदवारांना' मार्गदर्शन करणार आहेत. मनसेच्या राजगड या मध्यवर्ती कार्यालयात मनसेच्या प्रमुख नेत्यांनी मनसेच्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या होत्या. राज्यातील 288 मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची यादी मनसेने तयार केली असल्याची माहिती मिळत आहे. मनसे शंभर ते 125 जागा लढविण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांत मनसे विधानसभेसाठी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष आक्रमक भूमिका घेणार की ईडीनंतरची शांतता कायम राहणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने लाव रे तो व्हिडिओ म्हणत केंद्र सरकारची पोलखोल केली. त्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विधासभा निवडणुकीतही त्यांची मुलख मैदानी भाजपविरोधात धडाडणार का संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा प्रचारदौरे होणार का याचेही चित्र आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आजच्या त्यांच्या सभेत ईडी प्रकरणावरून राज ठाकरे सरकारवर काय निशाणा साधतात याबाबत मनसैनिकांसह तमाम जनतेला उत्सुकता लागलेली आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 30, 2019, 11:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.