ETV Bharat / state

सरकारला वठणीवर आणण्यासाठी राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज - राज ठाकरे

राज ठाकरे शनिवारी नेरुळमधील रामलीला मैदानात बेलापूर मतदारसंघाचे उमेदवार गजानन काळे यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

राज ठाकरे
author img

By

Published : Oct 19, 2019, 5:42 PM IST

Updated : Oct 19, 2019, 8:41 PM IST

मुंबई - सरकारला जर वठणीवर आणायचं असेल तर राज्यात आणि केद्रात सक्षम विरोधी पक्षाची गरज असल्याचे प्रतिपादन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. राज हे शनिवारी नेरुळमधील रामलीला मैदानात बेलापूर मतदारसंघाचे उमेदवार गजानन काळे यांच्या प्रचारासाठी आले होते.

राज ठाकरे बेलापूर येथे प्रचारसभेत बोलताना

हेही वाचा - ज्या योद्ध्याजवळ उमेद आहे, तो कधीही हारू शकत नाही; सोशल मीडियावर पवारांचा ट्रेंड

राज ठाकरेंनी शिवसेना भाजप युतीवर चांगलाच निशाणा साधला. राज ठाकरे यांची नेरूळ मधील सभा ही नियोजित वेळेपेक्षा ४ तास उशिराने सुरु झाल्याने, भर पावसात सभा सुरूच होती. "तुम्ही निवडणूक गांभीर्याने घेत नाही ,म्हणून तीच तीच लोक निवडून येतात. त्याच त्याच थापा मारतात." असे ते यावेळी म्हणाले.

ज्या व्यक्तीचा तुमच्या रोजच्या जगण्याशी सबंध आहे अशाच उमेदवारांना लोकांनी निवडणून द्यावे असेही ठाकरे यांनी यावेळी आवहन केले. गजानन काळेच्या रूपाने एक सुशिक्षित तरुण जो तळागाळातील आहे. म्हणून त्याला मी पुढे आणलं. तो जर बाकीच्यांसारखा वागला तर मी त्यालाही बाजूला करेन अशी थेट भूमिका त्यांनी मांडली.

वाढते परकीय लोंढे यावरही ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्रामधील निधी स्थानिक मराठी माणसावर खर्च होत नाही. असेही ते म्हणाले. तसेच नवी मुंबईतील भूमीपुत्रांच्या आंदोलनात गजानन काळे हे जेलमध्ये होते मग इतर नेते कुठे गेले होते? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. टोल माफीवर मनसेने आंदोलन केल्याचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. पंजाब नॅशनल बँक या मुद्द्यावर तुम्हाला राग येत नाही का? असा सवाल ठाकरे यांनी सभेत विचारला. मला राग येतो तो मी रस्त्यावर दाखवतोय. पोलिसांचे हात बांधलेत तुमची तोंड बांधली आहेत. सरकार जाहिराती करण्यात मशगुल आहे, अशी टीका त्यांनी सरकारवर केली.

हेही वाचा - कर्जतमधील पवार-शाह यांच्या सभेवर पावसाचे सावट

Intro:

नेरुळच्या रामलीला मैदानात राज ठाकरेंची तोफ धडाडली....

सेना भाजप यूतीवर टीकास्त्र

राज ठाकरे यांची सभा आज नेरुळ मधील रामलीला मैदानात बेलापूर मतदार संघाचे उमेदवार गजानन काळे यांच्या प्रचाराला प्रचारार्थ पार पडली.
यावेळी राज ठाकरेंनी शिवसेना भाजप युतीवर चांगलाच निशाणा साधला.
राज ठाकरे यांची नेरूळ मधील सभा ही नियोजित वेळेपेक्षा ४ तास उशिराने सुरु झाली, भर पावसात सभा सुरूच होती." तुम्ही निवडणूक गांभीर्याने घेत नाही म्हणून तीच तीच लोक निवडून येतात त्याच त्याच थापा मारतात असे ते यावेळी म्हणाले
ज्यांचा व्यक्तीचा तुमच्या रोजच्या जगण्याशी सबंध आहे असाच उमेदवार लोकांनी निवडणून द्यावे असेही ते म्हणाले
गजानन काळे च्या रूपाने एक सुशिक्षित तरुण जो तळागाळातील आहे म्हणून त्याला मी पुढे आणल आहे, तो जर बाकीच्यांसारखा वागला तर मी त्याला बाजूला करेन अशी थेट भूमिका त्यांनी मांडली
वाढते परकीय लोंढे यावरही त्यांनी निशाणा साधला
महाराष्ट्र मधील निधी स्थानिक मराठी माणसावर खर्च होत नाही आहे असेही ते म्हणाले नवी मुंबईतील भूमीपुत्रांच्या आंदोलनात गजानन काळे हे जेल मध्ये होते मग इतर नेते कुठे गेले होते असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला टोल माफीवर मनसेने आंदोलन केले होते या दोन मुद्यांव्यतिरिक्त ते नवी मुंबईतील विकासा संबंधी विशेष काही बोलले नाहीत. पंजाब नॅशनल बँक या मुद्द्यावर त्यांनी वक्तव्य केले व तुम्हाला राग येत नाही का? असा सवाल सभेत विचारला मला राग येतो तो मी रस्त्यावर दाखवतोय.. परकीय लोंढे जर कमी झाले नाहीत तर, नवी मुंबईत कोणी आतंकवादी बसला होता कुठे बॉम्ब स्पॉट झाला होत असेही ऐकू येऊ शकते. पोलिसांचे हात बांधलेत तुमची तोंड बांधली आहेत सरकार जाहिराती करण्यात मशगुल आहे, अशी टिका त्यांनी शासनावर केली. या सरकार ला जाब विचसरण्याची भूमिका घेऊन इथे आलो आहे. केंद्रात राज्यात सक्षम विरोधी पक्ष नसेल तर सरकार वठणीवर येणार नाही असेही ते म्हणाले व अवघ्या १५ ते २० मिनिटांत आपले भाषण आटोपते घेतले.
Body:.Conclusion:.
Last Updated : Oct 19, 2019, 8:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.