ETV Bharat / state

Metro Project : कल्याण तळोजा मेट्रोच्या कामाला लवकरच सुरूवात, एमएमआरडीएने निविदा केल्या जाहीर..

एमएमआरडीए (MMRDA) परिसरातील मेट्रोच्या कामांना आता वेग येऊ लागला आहे. कल्याण तळोजा मेट्रो (Kalyan Taloja Metro work) 12 या मेट्रोच्या कामासाठी 5800 रुपयांच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील सर्व स्थानके आणि डेपोचे काम सुरू होणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे कमिशन आयुक्त एस आर व्ही श्रीनिवासन (Commissioner SRV Srinivasan) यांनी दिली.

Metro Project
कल्याण तळोजा मेट्रो
author img

By

Published : Jan 9, 2023, 3:55 PM IST

मुंबई : कल्याण परिसरात राहणाऱ्या नागरिकांची आता वाहतूक कोंडीमधून सुटका होणार आहे.कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल या शहरांमधील नागरिकांना या मेट्रोमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. कल्याण-तळोजा मेट्रो-१२ (Kalyan Taloja Metro work) या मार्गिकेवरील कामांना लवकरच वेग येणार आहे. १७ मेट्रो स्थानकांसह डेपोंचे बांधकाम आणि विद्युतीकरणाच्या कामासाठी एमएमआरडीएने निविदा जाहीर केल्या आहेत. २०.७५ किलोमीटरच्या या प्रकल्पासाठी ५,८६५ कोटींचा खर्च केला जाणार आहे. या कामासाठी कंपन्यांना २ फेब्रुवारीपर्यंत निविदा दाखल करता येणार आहेत. तर ७ फेब्रुवारी रोजी निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. (Metro Project)

कोणती स्थानके असणार आहेत? : मेट्रो १२ च्या या प्रकल्प (Metro Project) मार्गिकेत गणेशनगर, पिसवलीगाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव या नऊ स्थानकांसह दोन्ही बाजूला फलाटासह स्टेशन हॉल उन्नत राहणार आहे. वडवलीत एकाच बाजूला ट्रॅक राहणार आहे. मात्र, निळजेगाव, बाले, वाकळण, तुर्भे, पिसावे डेपो, पिसावे येथील फलाट स्टेशन इमारत व फलाट उन्नत असेल, तर तळोजा स्थानकात एकाच बाजूला फलाट राहणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोसह कांजूरमार्ग-बदलापूर आणि कल्याण-तळोजा मेट्रो परस्पराना जोडण्याचे प्रस्तावित आहे. तर निळजेजवळ ती कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रोला जोडली जाणार असून भिवंडी-कल्याण ही मेट्रो कल्याणलाच जोडली जाणार असल्याची माहिती श्रीनिवासन (Commissioner SRV Srinivasan) यांनी दिली.

सल्लागार कंपनीची झाली नियुक्ती : गायमुख ते मीरा रोड, कल्याण ते तळोजा मेट्रो (Kalyan Taloja Metro) मार्गिकेसाठी सल्लागार म्हणून सिस्ट्रा एस.ए. आणि डी.बी. इंजिनीअरिंग आणि कन्सल्टिंग या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी २६८ कोटी ५३ लाख ३५ हजार ८६० रुपये खर्च प्रस्तावित आहे. कल्याण-डोंबिवली, शीळफाटासह नवी मुंबईतील रहिवाशांना या मेट्रो मार्गिकेचा फायदा होणार आहे. निळजेजवळ एमएमआरडीएचे (MMRDA) वृद्धी केंद्र होत असून शीळफाटा परिसरात अनेक बड्या विकासकांच्या खासगी टाउनशिप आकार घेत आहेत. बहुप्रतिक्षित अशा मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे ठाणे जिल्ह्यातील एक स्थानक-डेपो दिवा-आगासन-म्हातार्डीत उभे राहत आहे. यामुळे एमएमआरडीएला येथे मोठी जागा संपादन करून खूप काम करावे लागणार आहे. त्यामुळे भविष्यात या या परिसरातील रहिवाश्यांची समस्या काही प्रमाणात सुटणार असून त्याना मेट्रोचा पर्याय प्रवासासाठी उपलब्ध होणार तसेच लवकरच या कामांना सुरूवात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.