ETV Bharat / state

मेट्रो-1 ठरतेय एमएमओपीएलसाठी 'पांढरा हत्ती'; लॉकडाऊनमध्ये दुप्पट नुकसान

author img

By

Published : Aug 26, 2020, 8:06 PM IST

कोरोना लॉकडाऊनमुळे एमएमओपीएलला होणाऱ्या नुकसानीचा आकडा 500 ते 600 कोटींच्या घरात गेला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आपली या प्रकल्पातील 26 टक्क्यांची भागीदारी विकत मेट्रो 1 एमएमआरडीएच्या हवाली करण्याचा निर्णय एमएमओपीएलने घेतला आहे.

Metro
मेट्रो

मुंबई: वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो-1 कोरोनामुळे मार्चपासून बंद असून ती नेमकी कधी सुरू होणार याचे उत्तर कुणाकडेही नाही. मुळात सुरुवातीपासूनच मेट्रो-1 मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) साठी पांढरा हत्ती ठरत होती. दिवसाला 90 लाखांचा फटका बसत प्राधिकरणाला बसत होता. त्यात भर म्हणजे गेली साडे पाच महिने मेट्रो 1 बंद आहे. त्यामुळे एमएमओपीएलला होणाऱ्या नुकसानीचा आकडा 500 ते 600 कोटींच्या घरात गेला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आपली या प्रकल्पातील 26 टक्क्यांची भागीदारी विकत मेट्रो 1 एमएमआरडीएच्या हवाली करण्याचा निर्णय एमएमओपीएलने घेतला आहे.

मेट्रो-1 ठरतेय एमएमओपीएलसाठी 'पांढरा हत्ती

मुंबईकरांचे डोळे मात्र, मेट्रो1 कधी सुरू होणार आणि आपला कोरोनाच्या काळातील प्रवास सुकर कधी होणार याकडे लक्ष लागले आहे. एमएमओपीएल कोरोना काळात नव्या नियमांसह, नव्या बदलासह कोणत्याही क्षणी प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यास तयार आहे. फक्त आता केंद्र सरकारच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहत आहोत, अशी माहिती एमएमओपीएलमधील सूत्रांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

11.5 किमीचा वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो-1 मार्ग जून 2014 मध्ये सेवेत दाखल झाला आहे. या मेट्रो प्रवासासाठी मुंबईकरांना 10 ते 40 रुपये मोजावे लागतात. तर एमएमओपीएलच्या अनेक योजनांचा लाभ घेत स्वस्तातही प्रवासही करता येतो. मेट्रो-1 ला मुंबईकरांची सुरुवातीपासूनच चांगली पसंती मिळत आहे. दिवसाला सुमारे 4 लाख 50 हजार प्रवासी मेट्रोतून प्रवास करतात. यातून अंदाजे एक कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, त्याचवेळी एमएमओपीएलला दिवसाला 90 लाख रुपयांचा आर्थिक तोटाही सहज करावा लागत असल्याची कबुली खुद्द एमएमओपीएलने काही वर्षापूर्वी न्यायालयात दिली होती. एकूण आर्थिक नुकसानीचा आकडा 250 ते 300 कोटी असा दाखवला होता. म्हणजेच सुरुवातीपासूनच मेट्रो 1 तोट्यात धावत आहे. त्यात आता एमएमओपीएलच्या अडचणी कोरोना-लॉकडाऊनमुळे आणखी वाढल्या आहेत.

22 मार्चपासून मेट्रो-1 पूर्णतः बंद आहे. अशात दिवसाला होणारे नुकसान पावणे दोन ते दोन कोटीच्या घरात गेले असल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार एकूण नुकसान 600 कोटींच्या घरात गेल्याचीही चर्चा आहे. याविषयी एमएमओपीएलच्या प्रवक्त्याला विचारले असता अद्याप आम्ही किती नुकसान झाले, याची माहिती काढलेली नाही असे सांगितले. नुकसानीचा आकडा खूपच मोठा असल्याने एमएमओपीएलने याआधी भाडे वाढवण्याचा कित्येकदा प्रयत्न केला. न्यायालयीन प्रक्रियेत भाडेवाढीचे प्रस्ताव अडकले त्यामुळे अद्याप भाडेवाढ झालेली नाही. त्यात आता एक रुपयाही महसूल येत नसून याउलट देखभाल आणि व्यवस्थापनावर खर्च करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर एमएमओपीएलने मेट्रो-1 मधील आपली 26 टक्क्यांची भागीदारी विकून मेट्रो-1 एमएमआरडीएला देऊन टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तसे पत्र नगरविकास खात्याला पाठवण्यात आले आहे.

एमएमओपीएलच्या या मागणीनुसार नगरविकास खात्याने एमएमआरडीएला यासाठी अभ्यास करण्याच्या सूचना केल्या आहेत. मेट्रो-1 कशी आणि कितीला विकत घेता येईल, त्याच्या अटी-शर्थी काय असतील, हे सर्व यात ठरवले जाईल. दरम्यान एमएमआरडीएनेही लॉकडाऊन अगोदरच मेट्रो-1 विकत घेण्यासाठीची किंमत ठरवण्यासाठी निविदा मागवली होती. आता एमएमओपीएलनेही मेट्रो-1 विकण्याचा निर्णय घेतल्याने लवकरच मेट्रोृ1 एमएमआरडीएच्या ताब्यात येईल अशी शक्यता आहे.

मेट्रोत अनेक बदल तर नियमित ट्रायलही सुरू -

एमएमओपीएलचे होणारे नुकसान लॉकडाऊनमध्ये दुप्पट झाले आहे. मात्र, एमएमओपीएलने याचा कोणताही परिणाम मेट्रो-1 प्रकल्पाच्या दैनंदिन मेंटेनन्सवर व कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या पगारावर होऊ दिलेला नाही. सर्वांना पगार व्यवस्थित मिळत आहे. दुसरीकडे गाड्यांची नियमित ट्रायल्स आणि तपासणीही केली जात आहे. ओव्हरहेड वायरची तपाणसी, रुळांची देखरेख, स्थानकाची स्वच्छता अशा सर्व गोष्टी होत आहेत. महत्वाचे म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो-1 मुंबईकरांच्या सेवेत नव्या नियमांसह आणि बदलासह सज्ज आहे. आम्हाला फक्त केंद्र सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला की, पुढच्या क्षणाला मेट्रो-1 धावेल, असे एमएमओपीएलने सांगितले आहे. दरम्यान, अनलॉक 4 मध्ये मेट्रो सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.