मुंबई - घाटकोपर रेल्वे स्थानक पश्चिमेला असलेला रेड लाईट एरिया बंद करण्याची मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली. रेड लाईट एरियाच्या बाजूला महाविद्यालय आणि मंदिर असल्याने सामान्य लोकांची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने या ठिकाणी आज (दि. 25 जानेवारी) सायंकाळी रेड लाईट एरियात जाऊन तो व्यवसाय बंद केला. या व्यवसायाशी निगडित असणाऱ्या महिलांना रोजगार आणि पुनर्वसन करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचेही यावेळी आमदार कदम यांनी सांगितले.
गेली अनेक वर्षे मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानकाला लागूनच पश्चिमेला रेड लाईट एरिया असून या एरियाच्या बाजूला झुनझुनवाला कॉलेज, हिंदी हायस्कूल व एक मंदिर आहे. रेड लाईट व्यवसायचा भाग जवळ असल्याने या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि भाविकांना याचा त्रास होतो. आज भाजपचे स्थानिक आमदार राम कदम यांनी त्या ठिकाणी जाऊन हा व्यवसाय बंद केला. या व्यवसायात असलेल्या महिलांचे पुनर्वसन करून रोजगार द्यावा, अशी कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली. हा व्यवसाय कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे, असे निवेदन घाटकोपर पोलीस ठाण्याला दिले. एक फेब्रुवारीपासून घाटकोपरमध्ये नशा मुक्ती आंदोलन सुरू करणार असल्याचेही राम कदम यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - 'एमआयएमच्या नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावे, नाहीतर मनसेचा दणका बसेल'