ETV Bharat / state

'सरकार रोहित पवार यांच्यावर कारवाई करणार का' - Mumbai NCP news

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोलापुरात 75 रेमडेसिवीर इंजेक्शन दिले आहे. यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकार रोहित पवार यांच्यावर कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित केला आहे.

MLA Pravin Darekar criticism on Nawab Malik for Remdesivir injection
प्रवीण दरेकर
author img

By

Published : Apr 12, 2021, 3:03 PM IST

Updated : Apr 12, 2021, 4:28 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना राज्यातील राजकारण तापत आहे. आरोग्य सुविधांवरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा सामना रंगत असल्याचे चित्र आहे. देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुडवडा असताना गुजरातमध्ये भाजप कार्यालयात हे इंजेक्शन दिले जात आहे, हे राजकारण नाही का, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विचारला होता. या मुद्द्यावरून आता भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार पलटवार करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी रेमडेसिवीर कोठून चोरून आणले हे मलिक विचारणार नाहीत का, असा सवाल उपस्थित केला आहे.

बोलताना प्रवीण दरेकर

मलिक रेमडेसिवीर चोरून आणल्याचा गुन्हा दाखल करणार का..?

गुजरातमध्ये भाजपने रेमडेसिवीर चोरुन आणले होते का? असा सवाल राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला होता.आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोलापुरातील कार्यकर्त्यांना रेमडेसिवीर दिल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. नवाब मलिक आता रोहित पवारांना हे इंजेक्शन कुठून चोरुन आणले हे विचारणार का? मलिक हे खरंच निष्पक्ष असतील तर ते रोहित पवार यांच्यावर रेमडेसिवीर चोरुन आणल्याचा गुन्हा दाखल करणार का, असा खरमरीत सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून आता पुणे, नगर, बीड, सोलापूर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी तुटवडा असलेल्या 300 रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीकड़ून देण्यात आली आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून सोलापूरकरांसाठी 75 'रेमडेसिवीर'

हेही वाचा - महाराष्ट्रात तुटवडा तर गुजरातेत भाजपकडून रेमडेसिवीरचे निःशुल्क वाटप

Last Updated : Apr 12, 2021, 4:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.