मुंबई - आज भाजप-शिवसेना युतीचे उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पूनम महाजन यांची रॅली कुर्ला पश्चिम येथील वत्सलाताई नगर येथून सकाळी सुरू होऊन ती यशवंतनगर या ठिकाणी दुपारी समाप्त झाली. कुर्ला पूर्वला आज पूनम महाजन यांच्या रोड शोमध्ये स्थानिक शिवसेना आमदार मंगेश कुढाळकर यांनी सहभाग घेतला होता.
पूनम महाजन युतीतर्फे निवडणूक लढवत आहेत. आमदार मंगेश कुढाळकर यांना युतीबाबत विचारले असता, ते म्हणाले मागील घटना विसरून काम करत आहोत. काही महिने पूनम महाजन यांच्यावर शिवसेना आमदार मंगेश कुढाळकर यांनी खासदार पूनम महाजन यांनी विभागात एक तरी काम केले आहे का, ते दाखवा असा आरोप केला होता.
नुकतेच २१ जानेवारी २०१९ ला लोकमान्य टिळक क्रीडांगण येथे खासदार पूनम महाजन आणि स्थानिक भाजप नगरसेवक सावंत यांनी टिळकनगर समाज मंदिर वास्तू भूमिपूजन समारंभ केला होता. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ कोटी रुपये मंजुरी दिली आहे. अशाप्रकारे विभागात फलक लावण्यात आले होते. हे काम भाजपने केले आहे, असे त्यावेळी खासदार पूनम महाजन म्हणाल्या.
दुसऱ्या दिवशी २२ जानेवारी २०१९ ला सांयकाळी शिवसेना आमदार मंगेश कुढाळकर यांनी त्याच जागेवर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते टिळकनगर समाज मंदिर वास्तू भूमिपूजन केले होते. यावेळी या कार्याचे श्रेय केवळ मंगेश कुढाळकर यांना जाते, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मित्र पक्ष व खासदार पूनम महाजन यांनी श्रेय घेऊ नये असेही ते म्हणाले होते.
आता सेना-भाजपची युती झाली आहे. या पाश्वभूमीवर कुर्ला स्थानिकचे आमदार मंगेश सदरच्या रोडशो रॅलीमध्ये मोठ्या संख्येने जनसमुदायासह सामील झाले होते, त्याच्यासोबत आर पी आय (अ) चे अविनाश महोतकर, श्रीकांत भीसे रॅलीत सहभागी झाले होते.