ETV Bharat / state

Bhaskar Jadhav Boycott Budget Session: भास्कर जाधवांचा अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार; म्हणाले, 'माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय...' - Shivsena MLA Bhaskar Jadhav

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. ते विधानसभेत शिंदे सरकार विरूद्ध आक्रमक भूमिका मांडत आले आहेत. सत्तारूढ पक्षाला कात्रीत पकडण्यात त्यांचा हातखंडा आहे; पण यंदा सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार जाधव हे सातत्याने नाराज दिसले. राज्य शासन त्यांचा आवाज जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप करत भास्कर जाधव यांनी आता अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.

Bhaskar Jadhav Boycott Budget Session
आमदार भास्कर जाधव
author img

By

Published : Mar 21, 2023, 5:04 PM IST

आमदार भास्कर जाधव त्यांची आणि राज्याची व्यथा सांगताना

मुंबई: उद्धव ठाकरे गटाचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे नेहमी अधिवेशनादरम्यान चर्चेत राहिले आहेत. विशेष करून महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्यानंतर त्यांनी शिंदे सरकारला धारेवर धरले होते. अशातच राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यावर त्यांच्यावर आसूड ओढण्यात ते नेहमी पुढे राहिले आहेत.

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला: याविषयी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, उद्या नवीन वर्ष गुढीपाडवा आहे. तो आपण साजरा करणार आहोत. चैत्र महिन्यात असणारे हे नवीन वर्ष आहे. आपल्या हातून चांगले काम व्हावे, आपल्या कुटुंबाचे, आपल्या जिल्ह्याचे नाव उंच जावो हीच इच्छा असते. आज मला समजले की, टेक्सटाइलचे कमिशनर ऑफिस दिल्लीत जात आहे. मुंबई ही गिरणी कामगारांची आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन होत आहे. याला उभारी द्यायची गरज होती. महाराष्ट्रातील अनेक उद्योग, महत्वाची कार्यालये २०१४ नंतर गुजरातमध्ये नेण्यात आलीत. टेक्सटाइल ऑफिस हे जर दिल्लीला नेले जात असेल तर महाराष्ट्र कसा खिळखिळा होत आहे हे आता जनतेने पहावे, असेही भास्कर जाधव म्हणाले.

मला सभागृहात बोलू दिले जात नाही: भास्कर जाधव पुढे म्हणाले की, विदर्भ, मराठवाड्यात शेतकरी खूप संकटात आहे. निसर्ग कोपल्याने त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. सभागृहात मी पुन्हा आता येणार नाही. कारण मला जाणीवपूर्वक सभागृहात बोलू दिले जात नाही. हे सभागृह घटनेने चालावे अशी अपेक्षा असते. परंतु, कामकाजातून मला बाहेर ठेवले जात आहे. हे सर्व जाणीव पूर्वक केले जात आहे. माझी एकही लक्षवेधी लागलेली नाही. मला ही फार मोठी खंत आहे.

कोकण व विदर्भावर बोलायचे होते: कोकणात खूप पाऊस पडतो आणि रस्ते खराब होतात. पण १९९२-९३ मध्ये एनरॉन कंपनीने रस्ते बांधले ते अजून 'जशास तसे' आहेत. असे असताना त्या प्रकारचे रस्ते आज का बांधले जात नाहीत? हा मुद्दा मला सभागृहात उपस्थित करायचा होता. कोकणात फार मोठी आपत्ती आल्याने शेतकरी उद्‌ध्वस्त झाला. पण, तो कधी आत्महत्या करत नाहीत. त्यांची मानसिकता फार मोठी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी सरकारने एक गट नेमावा ते अभ्यास करतील व विदर्भ आणि मराठवाड्यात आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करतील. हा मुद्दा मला सभागृहात उपस्थित करायचा होता.

आक्रोश मोर्चे कसले काढता? आमदार नितेश राणे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी आमदार निलेश राणे यांच्याबाबत मी काही बोलत नाही. एकीकडे राज्यात, केंद्रात तुमचे शासन आहेत, असे असताना त्यांना आक्रोश मोर्चे काढावे लागत आहेत, ही खंताची बाब आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाय यांचे हिंदुत्व लंगडे आणि बनावटी झाले आहे, अशी बोचरी टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.

हेही वाचा: NSA against Amritpal : खलिस्तान समर्थक अमृतपालवर लावला राष्ट्रीय सुरक्षा कायदा.. जाणून घ्या काय आहे हा कायदा?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.