मुंबई - राज्यात ज्या सत्ता स्थापनेच्या ज्या घडामोडी घडत आहे, त्यानंतर आता प्रश्न उत्तरांचा तास संपला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते अपक्ष आमदारांना आपल्यासोबत घेण्यासाठी संवाद करतील, यात काही नवीन नाही. गेल्या एक महिन्यात सुरू असलेल्या चर्चेत पवार आणि पवार यांच्याशिवाय काही दिसत नाही. पवारांनी या सर्व राजकारणाची सुरुवात केली आणि पवाराच शेवट करतील असे प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष व अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी म्हटले. ते पत्रकारांशी बोलत होते.
जे काही घडले, त्यावर एक अभ्यास होणे आणि यापुढे कसला मार्ग निवडला पाहिजे याचा विचार करणे गरजेचे आहे. जनतेला देखील या सर्वांची आतुरता लागली आहे. सत्ता स्थापनेसाठी इतका वेळ का लागतो याचा अभ्यास करावा लागेल. महाविकास आघाडी मजबूत आहे असे देखील कडू म्हणाले. राजकारणाच्या आता काही मर्यादा राहिल्या नाही. समुद्राचा तळ शोधणे कठीण आहे, तसंच माणसाचं मन शोधणेही कठीण आहे. या राजकारणात सामान्य माणसाला वेड लागून रुग्णालयात भरती होण्याची वेळ येईल असे देखील त्यांनी या सत्ता नाट्यावर भाष्य केले.
हेही वाचा - सुप्रिया सुळेच पवारांच्या वारसदार, दिग्विजय सिंह यांनी दिल्या शुभेच्छा
या सर्व सत्ता नाट्यात जो जिता वो ही सिकंदर ठरेल. माझा नेता जनता आहे, गावातील लोक माझे नेता आहेत त्यामुळे मी बिनधास्त फिरतो असे कडू म्हणाले. आता राजकारणात जो तरबेज आहे, तोच जिंकेल असेही त्यांनी नमूद केले. हे संख्यांचे गणित आहे, अजित पवारांनी आघाडीवर एक हात मारला, आता दुसरा हात जो मारेल त्याच्याच हातात शेवट राहील, असे कडू पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
हेही वाचा - शिवसेनेविना भाजपकडे 170 आमदारांचे संख्याबळ - आशिष शेलार