ETV Bharat / state

Babanrao Pachpute : आमदार बबनराव पाचपुते यांना विधिमंडळात श्वसनाचा त्रास, रुग्णालयात दाखल - बबनराव पाचपुते रुग्णालयात दाखल

भाजपचे आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Babanrao Pachpute admitted to hospital). विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान त्यांनी श्वसनास त्रास होत असल्याची तक्रार केली होती. (Babanrao Pachpute breathing problem in legislature).

Babanrao Pachpute
Babanrao Pachpute
author img

By

Published : Dec 22, 2022, 3:56 PM IST

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांनी गुरुवारी महाराष्ट्र विधीमंडळ संकुलात श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार केली. (Babanrao Pachpute breathing problem in legislature). त्यानंतर त्यांच्यावर संकुलाच्या आवारातील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर तेथून त्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले. सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session of Maharashtra Legislature) नागपुरात सुरू आहे.

दम्याचा झटका असल्याची शक्यता : विधानभवनाच्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिकरित्या हा तीव्र दम्याचा झटका असल्याची शक्यता आहे. 60 वर्षांच्या वर वय असलेल्या पाचपुतेंना दुपारी 12.30 च्या सुमारास श्‍वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथे त्यांना तातडीचे उपचार देण्यात आले आणि त्यानंतर त्यांना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आले, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.