मुंबई Missing Boy In Mumbai : खेळण्यासाठी घराबाहेर गेलेला आठ वर्षाचा गतीमंद चिमुकला घरी परतलाच नसल्यानं मोठी खळबळ उडाली होती. ही घटना 5 सप्टेंबरला गिलबर्ट हिल परिसरात घडली होती. या प्रकरणी डी एन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा ( Mumbai Crime ) दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या गतीमंद चिमुकल्याचा 12 तासात शोध घेऊन चिमुकल्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात दिल्यानं सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
अशी घडली होती घटना : गिलबर्ट हिल परिसरातील चिमुकला गतीमंद मुलगा सकाळी साडेअकराच्या सुमारास घराबाहेर खेळण्यास गेला होता. मात्र बराच वेळ झाल्यानंतरही तो परत न आल्यानं त्याच्या पालकांनी डी एन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या चिमुकल्याला कोणीतरी पळवून नेल्याचा संशय चिमुकल्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता. त्यामुळे डी एन नगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 363 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती डी एन नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद कुरडे यांनी दिली.
अंधेरीतून लोकलं बोरीवलीकडं गेला मुलगा : डी एन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ मुलाचा शोध सुरु केला. यावेळी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केल्यानंतर हा मुलगा अंधेरी रेल्वे स्टेशन इथून लोकल ट्रेननं बोरीवलीच्या दिशेनं जाताना आढळून आला. त्याप्रमाणे बोरीवली व दहीसर परिसरात पथकं रवाना करण्यात आले. दहीसर पोलीस ठाण्याच्या मदतीनं हरवलेल्या मुलाचा शोध 12 तासात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चिमुकला सापडल्यानं पालकांना अश्रू अनावर : आठ वर्षाचा चिमुकला अंधेरी परिसरातून हरवल्यानं त्याच्या पालकांनी मोठा आक्रोश केला होता. मात्र पोलिसांनी 12 तासात शोध घेत चिमुकला त्याच्या पालकांकडं सोपवला, त्यामुळे त्याच्या पालकांना अश्रू अनावर झाले. या चिमुकल्याच्या पालकांनी मुलगा सुरक्षित मिळाल्यानं पोलिसांचे आभार व्यक्त केले. ही कामगिरी डी एन नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद कुरडे, पोलीस निरीक्षक वाहीद अकबर पठाण, निवृत्ती बोऱ्हाडे, सहायक पोलीस निरीक्षक राकेश पवार, सहायक पोलीस निरीक्षक सुनीत घाडगे, सहायक पोलीस निरीक्षक बेदरे आणि महिला पोलीस उपनिरीक्षक खान आधी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा :