ETV Bharat / state

Uday Samant on Nana Patole : महाविकास आघाडीचे नेतृत्व नाना पटोले करणार का? उदय सामंतांचा खोचक टोला - Nana Patole

कर्नाटकात कॉंग्रेसने बाजी मारल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा दावा केला जातो आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व नाना पटोले करणार का, असा खोचक टोला शिवसेना शिंदे गटाचे आमदार, मंत्री उदय सामंत यांनी लगावला. आगामी निवडणुका, जागा वाटप, 16 आमदारांच्या अपात्रेचा निर्णयावरून सामंत यांनी शिंदे सरकारची भूमिका स्पष्ट केली.

Minister Uday Samant and Nana Patole
मंत्री उदय सामंत व नाना पटोले
author img

By

Published : May 15, 2023, 9:18 PM IST

मुंबई: कर्नाटक राज्यात कॉंग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने कंबर कसली. या पार्श्वभूमीवर रविवारी महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांच्या उपस्थित बैठक झाली. मंत्री सामंत यांनी या बैठकीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर चिमटा काढला. दहा महिन्यापूर्वी शिवसेनेच्या आमदारांनी उठाव केला. अनैसर्गिक युती तोडावी, अशी यामागे एकच भूमिका होती. शिवसेना त्यावेळी नंबर दोनचा पक्ष होता. महाविकास आघाडी झाल्यानंतर पक्षाची वाताहत झाली. आघाडीमध्ये ठाकरेंचे स्थान घसरले आहे. त्यामुळेच आघाडीच्या बैठकीत ठाकरेंच्या बसण्याचे स्थान कुठे होते, हे दिसून आले, असा खोचक टोला मंत्री सामंत यांनी लगावला. तसेच कर्नाटक निवडणुकीनंतर अनेकांना महाराष्ट्रात आघाडीचे सरकार येईल, असे स्वप्न पडू लागली आहेत. मात्र, आघाडीचे नेतृत्व नाना पटोले करणार का, असा सवाल मंत्री सामंत यांनी विचारत, शिवसेना ठाकरे गटाला डिवचले.

हा तर उरलेसुरले टिकवण्याचा प्रयत्न: राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर विरोधकांकडून जोरदार टीकास्त्र सोडले जाते. मुख्यमंत्री संवेदनशील असल्याने त्यांच्यावर टीका केली जाते. ठाकरे गटाकडून सरकार घटनाबाह्य आहे. तर राष्ट्रवादीकडून बहुमताचे सरकार आहे, असे म्हटले जाते. आघाडीत दोन मतमतांतर आहेत, असे वारंवार दिसून येते. आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. मात्र, ठाकरे गट 5 व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. भाजपशी केलेली प्रतारणा ठाकरेंच्या नाशाचे कारण ठरली, असा शब्दांत मंत्री सामंतांनी ठाकरेंना फटकारले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांवर वाटेल त्या शब्दांत टीका सुरु आहे. उपध्यक्षाकडून अपात्र बाबत विधाने होत आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागला असा दावा सुरु आहे. पक्षांमधील उरले सुरले पदाधिकारी टिकवण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे, असे मंत्री सांमत म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमधील कार्यपध्दतीचा देखील त्यांनी यावेळी पाढा वाचला.

जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप नाही: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रत्येकाला घाई सुरु आहे. परंतु, प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. आरक्षणाच्या मुद्द्यांमुळे निवडणुका रखडल्या आहेत. निवडणुका जेव्हा होतील, त्याला सामोरे जायला आम्ही तयार आहोत, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. निवडणूक साठी जागा वाटपचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यावर निर्णय घेतील. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत, असेही सामंत म्हणाले. कर्नाटक निवडणुकीनंतर ईव्हीएम नको, अशी ओरड कॉंग्रेसकडून सुरु आहे. विश्वास नसेल तर, कर्नाटकची निवडणुक परत घ्या, असे प्रत्युत्तर मंत्री सांमत यांनी दिले.

अध्यक्षावर अविश्वास बरा नाही: विधानसभा अध्यक्ष परदेश दौऱ्यावर असताना, ठाकरे गटाकडून निवदेन देण्यात आले आहे. अध्यक्ष परदेश दौऱ्यावरुन आले की, 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतील. आजकाल विधानसभा अध्यक्षांना अल्टिमेटम देण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु, हे कुणाला द्यायचे, हे कळायला हवे, असे मंत्री सामंत यांनी सांगत संजय राऊतांवर निशाणा साधला. तसेच अपात्रेबाबत निकाल हा अध्यक्ष न्यायालयाच्या चौकटीत राहून घेणार आहेत. काही लोकं प्रत्येकांवर अविश्वास दाखवतात, अविश्वास दाखवतात हे योग्य नाही, असे त्यांनी आवाहन केले. तसेच राज्यात व्हायरल व्हिडीओवरून तेढ निर्माण झाल्यानंतर अशा प्रकृती ठेसून काढण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

सीमा प्रश्न सोडवणार का: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्र- कर्नाटक सीमा वादाचा प्रश्नांवरुन मंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीला कोंडीत पडकले. कर्नाटकात कॉंग्रेसचे सरकार आले आहे. आता बेळगाव, सीमा प्रश्न कशा प्रकारे आणि किती तत्परतेने सोडवला जातो. हे पाहणे महत्वाचे आहे. आम्ही त्यावर लक्ष ठेवून असणार आहे, असे मंत्री सामंत म्हणाले. तसेच बारसूतील माती परिक्षण संपलेले आहे. पोलिस फोर्सही मागे घेतलेले आहेत. त्यानंतर माती परीक्षण अहवाल आल्यानंतर पुढे नागरिकांशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर प्रकल्पाबाबत पुढे निर्णय घेऊ, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. कातळ शिल्पाला कुठलाही धक्का लागणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -

  1. Ajit Pawar on MLAs Disqualified सोळा आमदार अपात्र झाले तरीही सरकारला कोणताच धोका नाही विधानानंतर अजित पवार पुन्हा चर्चेत
  2. DCM on Ahmednagar Violence राज्यात जाणीवपूर्वक दंगल घडवून आणणाऱ्यांना सोडणार नाही देवेंद्र फडणवीसांचा इशारा
  3. Sanjay Raut FIR म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.