मुंबई - अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, असे नामांतर करण्यात आले आहे. सत्तेवर येण्यापूर्वी ज्यांच्या नावाने मत मागितली त्यांचेच नाव आज बदलण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न मिळालेल्या महापुरुषांचा हा घोर अवमान केला आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी, पंतप्रधान मोदी यांना चांगलेच फटकारले.
जनता खपवून घेणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आलेल्या त्या स्टेडियमला भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने ओळखले जात होते. आता ते नरेंद्र मोदी यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. नावे बदलण्याच्या धुंदीत भाजप सरकार सर्व हद्द पार करत आहे. आतापर्यंत शहरांची नावे बदलली जात होती. आता तर भारतरत्नांची नावे असलेली रुग्णालय व स्टेडियम बदलली जात आहेत, ही दु:खाची बाब आहे. देशाची जनता हे कधीही खपवून घेणार नाही, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.
हेही वाचा - राज्यात आज 51 हजार 315 तर आतापर्यंत 10 लाख 80 हजार 675 लाभार्थ्यांचे लसीकरण