ETV Bharat / state

एक 29 वर्षाचा तरुण टीम मेंबर म्हणून माझ्याकडे बघावं - आदित्य ठाकरे - टीम मेंबर म्हणून माझ्याकडे बघावं

प्रोटोकॉल बाजूला ठेवून एक 29 वर्षाचा तरुण टीम मेंबर म्हणून माझ्याकडे बघावं. तसेच एक टीम म्हणून माझ्यासोबत काम करावे, अशा सुचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच जिथे सूचना, चुका असतील त्या मोकळेपणाने मांडाव्यात असेही ठाकरे म्हणाले.

Minister Aaditya thackeray instruction to officers in mumbai
आदित्य ठाकरे
author img

By

Published : Jan 17, 2020, 10:45 AM IST

मुंबई - प्रोटोकॉल बाजूला ठेवून एक 29 वर्षाचा तरुण टीम मेंबर म्हणून माझ्याकडे बघावं. तसेच एक टीम म्हणून माझ्यासोबत काम करावे, अशा सुचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच जिथे सूचना, चुका असतील त्या मोकळेपणाने मांडाव्यात असेही ठाकरे म्हणाले.

मुंबई उपनगर, पूर्व व पश्चिम उपनगरातील पायाभूत प्रकल्पांची आढावा बैठक उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आदित्य ठाकरे यांनी बोलावली होती. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईची जबाबदारी मोठी आहे. मुख्यमंत्री हे पहिल्यांदाच मुंबईत राहणारे आहेत. त्यामुळे मुंबईत जे काही घडत आहे, त्याचा परिणाम थेट मुख्यमंत्र्यांवर होतो. सर्व एकाच विचाराचे असल्याने पालिका आणि महाराष्ट्र सरकारच्या सर्व यंत्रणांना आता एकत्र काम करण्यासाठी वाव आहे. काही दिवस मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीसुद्धा सर्व यंत्रणांच्या आढावा बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी टीम म्हणून काम करण्याच्या सूचना आदित्य ठाकरे यांनी अधिकारी वर्गाला दिल्या.

तुमचा सर्वांचा अनुभव मोठा आहे. अधिकारी वर्गाने ठरवलं की मुंबईच विकास करायचा तर तो होणार. आता मुंबईच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी प्रत्येक महिन्यात बैठक बोलावणार असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक पैसा कुठे वापरला गेला याची माहिती जनतेला व्हावी. आपण मुंबई सुधारण्यासाठी आलो असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

Intro:
मुंबई - प्रोटोकॉल बाजूला ठेवून एक 29 वर्षाचा तरुण टीम मेंबर म्हणून माझ्याकडे बघावं, आणि टीम म्हणून काम करावं असे उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी उपनगरातील सर्व यंत्रणांच्या अधिकारी वर्गाला सूचना केली.
आणि जिथे सूचना चुका असतील त्या मोकळेपणाने मांडाव्यात असेही ते म्हणाले. आज
मुंबई उपनगर, पूर्व व पश्चिम उपनगरातील पायाभूत प्रकल्पांच्या आढावा बैठक उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आदित्य ठाकरे यांनी बोलावली होती, त्यावेळी ते बोलत होते.
Body:मुंबईची जबाबदारी मोठी आहे. मुख्यमंत्री हे पहिल्यांदाच मुंबईत राहणारे आहेत, त्यामुळे मुंबईत जे काही घडत त्याच परिणाम थेट मुख्यमंत्र्यांवर होतो. सर्वच एकाच विचाराचे असल्याने पालिका आणि महाराष्ट्र सरकारच्या सर्व यंत्रणा यांना आता एकत्र काम करण्यासाठी वाव आहे. काही दिवस मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुद्धा सर्व यंत्रणांच्या आढावा बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी टीम म्हणून काम करण्याच्या सूचना आदित्य ठाकरे यांनी अधिकारी वर्गाला दिल्या.
तुमचं सर्वांचा अनुभव मोठा आहे. अधिकाऱ्यांनी वर्गाने ठरवलं की मुंबईच विकास करायच तर ते होणार. आता मुंबईच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी प्रत्येक महिन्यात बैठक बोलावणार असल्याचे ते म्हणाले.
प्रत्येक पैसा कुठे वापरला गेला याची माहिती जनतेला व्हावी आपण मुंबई सुधारण्यासाठी आल्याचे त्यांनी म्हटले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.