ETV Bharat / state

राज्यात ठिकठिकाणी दूध बंद आंदोलन; कुठे टँकर फोडून, तर कुठे दुग्धाभिषेक करून नोंदवला निषेध

माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दूध दरवाढीसाठी राज्यात दूध बंद आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असताना पाहायला मिळत आहे. आज एक दिवस राज्यातील सर्व दूध संकलन बंद करण्याचे शेट्टी यांनी आवाहन केले होते. त्यानुसार राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. यासंदर्भातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर...

milk ban agitation maharashtra  milk rate hike agitation  swabhimani shetkari sanghatana agitation  स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन  दूध बंद आंदोलन महाराष्ट्र  दूध दरवाढीसाठी आंदोलन
राज्यात ठिकठिकाणी दूध बंद आंदोलन; कुठे टँकर फोडून, तर कुठे दुग्धाभिषेक करून नोंदवला निषेध
author img

By

Published : Jul 21, 2020, 1:10 PM IST

Updated : Jul 21, 2020, 5:10 PM IST

मुंबई - माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दूध दरवाढीसाठी राज्यात दूध बंद आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असताना पाहायला मिळत आहे. आज एक दिवस राज्यातील सर्व दूध संकलन बंद करण्याचे शेट्टी यांनी आवाहन केले होते. त्यानुसार राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पाठिंबा देत दूध बंद आंदोलनात सहभाग नोंदवला आहे, तर काही ठिकाणी इशारा देऊन दूध संकलन केलेल्या दुधाचे टँकर फोडण्यात आले आहे.

राज्यात ठिकठिकाणी दूध बंद आंदोलन; कुठे टँकर फोडून, तर कुठे दुग्धाभिषेक करून नोंदवला निषेध

कोल्हापूर - जिल्ह्यातील नांदणी येथे काळ भैरवनाथाला दूग्धाभिषेक घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजच्या आंदोलनाला सुरुवात केली. शिवाय गावातल्या एकाही व्यक्तीने दूध डेअरीमध्ये न घालता गावातीलच गोरगरीब लोकांना वाटत आंदोलनाला पाठिंबा दिला. स्वाभिमानी संघटनेचे दूध दरवाढीसाठी आज राज्यव्यापी दूध बंद आंदोलन आहे. त्याला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.

बीड - राज्यातील दुग्ध व्यवसाय संकटात सापडला आहे. शासनाने तात्काळ प्रति लिटर मागे 5 रुपये तात्काळ भाववाढ करावी अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी बीड बायपास मार्गावर दुधाचा टँकर अडवून भररस्त्यावर दुधाच्या टँकरच्या टायरमधील हवा सोडली. याशिवाय बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामधील गोविंदवाडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे यांनी मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून सरकारविरोधातील रोष व्यक्त केला.

येवला (नाशिक) - न्याहारखेडे गावात दूध दरवाढ संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रावण देवरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून यावेळी दूध रस्त्यावर न फेकता गावातील गोर-गरिब गरजूंना ते वाटप करण्यात येऊन दूध दरवाढ त्वरीत करावी, अशी मागणी यावेळी दूध उत्पादकांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे यांनी केले.

सोलापूर - पंढरपुर तालुक्यातील खेडभोसे, तर माळशिरस तालुक्यात वेळापूर, खंडाळी येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याकडून पहाटेच्या सुमारास टँकरमधील दूध रस्त्यावर सोडून काही ठिकाणी दुधाच्या पिशव्या रस्त्यावर टाकून आपला रोष व्यक्त केला. दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढत संसर्ग पाहता सर्व नियमांचे पालन करून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

लातूर - दिवसेंदिवस दुधाचे दर घसरत आहेत. त्यासाठी आज राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन केले जात आहे. लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथील ग्रामदैवत निलकंटेश्वराला दुग्धाभिषेक घालून रोष व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे योग्य दराबाबत आठ दिवसांत निर्णय झाला नाही तर वेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

सोलापूर - गायीच्या दूधाला 25 रूपये प्रतिलिटर दर आणि 5 रूपये अनुदान देण्याच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला दूधाचा अभिषेक घालून आंदोलनाला सुरुवात केली.

अहमदनगर - जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही दूध आंदोलन सुरूच आहे. अकोले तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून दगडाला दुग्धाभिषेक घालत दुधाला हमीभाव देण्याची मागणी किसान सभा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनाकडून करण्यात येत आहे. डॉ अजित नवले यांच्याकडून सोमवारपासून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.

राज्यात ठिकठिकाणी दूध बंद आंदोलन

पुणे - राज्यात गेल्या चार महिन्यांपासून ‘कोरोना‘मुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याने दूध संघ कमी दराने दूध खरेदी करीत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधाला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नेते आणि दूध उत्पादक प्रतिलिटर अनुदान द्यावे, अशी मागणी करत आहेत. राज्यात विविध ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पुण्यातही बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने कात्रज दूध संघाच्या बाहेर दूध बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारला इशारा देत रस्त्यावर दूध ओतले.

आंबेगाव (पुणे) - पुण्याच्या ग्रामिण भागातील दूध उत्पादक शेतकरी दुधाच्या दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात खासगी व सहकारी दूध संघ आणि छोट्या-मोठ्या दूध व्यावसायिक तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतला. आज संपूर्णपणे दूध संकलन बंद ठेवण्यात आले आहे.

बारामती - दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी राज्यात दूध बंद आंदोलनाची हाक दिली आहे. त्यांनी केलेल्या आव्‍हानावरून आज बारामतीत ठीकठिकाणी दूध वाटप करून अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

अहमदनगर - तालुक्यातील खडकी येथे आज शेतकऱ्यांनी एकत्र येत गावातील मारुती मंदिरात मारुतीच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून सरकारला लवकर सद्बुद्धी देऊन दुधाला किमान दहा रुपयांचे अनुदान त्वरित जाहीर करण्याची मागणी केली आहे. यावेळी सामाजिक अंतर पाळत मंदिरात एक सभा पार पडली. यावेळी शेतकऱ्यांनी पक्षभेद बाजूला ठेवत बळीराजाने दूध दरवाढीसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

अमरावती - दुधाच्या दरात वाढ व्हावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजपा, शिवसंग्रामसह आदी शेतकरी संघटनांनी आंदोलन करून सरकारच लक्ष वेधले. जिल्ह्यातील मोझरी गावातही युवा संघर्ष संघटनेच्या वतीने दूध दरवाढीच्या मागणीसाठी शेतकऱ्याच्या मुलाची दुधाने आंघोळ करून व महादेवाच्या पिंडीवर दूध ओतून दूध दरवाढीची मागणी करत आंदोलन केले.

यवतमाळ - कोरोना लॉकडाऊनच्या काळात दूध व्यवसायावर विपरित परिणाम झाला. दुधाच्या मागणीत घट झाली. बाजारातील दर कमी झाले आहे, अशा परिस्थितीत केंद्र शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा व दूध उत्पादकांना दर वाढवून देण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. दुधाचे भाव वाढवावे यासाठी महागाव तालुक्यातील वागद ईजारा येथील शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करीत परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन हे आंदोलन करण्यात आले.

Last Updated : Jul 21, 2020, 5:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.