ETV Bharat / state

Tirupati Devasthanam : तिरूपती देवस्थानच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांना दुसऱ्यांदा संधी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची यादी जाहीर केली आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर शिवसेनेचे सचिव तथा उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर यांची पुन्हा वर्णी लागली आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2023, 10:47 PM IST

Milind Narvekar
मिलिंद नार्वेकर

मुंबई : तिरुमला तिरुपती देवस्थान विश्वस्त मंडळाच्या सदस्यपदी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना दुसऱ्यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेल्या ठाकरेंच्या शिलेदाराची मुख्यमंत्री शिंदे यांनी शिफारस केल्याने, सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे नार्वेकर यांच्या भूमिकेबाबत अजूनही साशंकता आहे. (Tirumala Tirupati Devasthanam)

मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस : तिरुमला तिरुपती देवस्थान विश्वस्त मंडळाच्या 28 सदस्यीय पदासाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री दर दोन वर्षांनी एका व्यक्तीची आंध्र प्रदेश सरकारला शिफारस करतात. 2018 मध्ये भाजपचे नेते आणि तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार यांची विश्वस्त मंडळावर नियुक्ती केली होती. 2021 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केली होती.

तिरूपती देवस्थानच्या सदस्यपदी नव्या नावाची शिफारस? : शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार राज्यातून पायउतार झाले आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे सरकार सत्तेत आले. शिवसेना (ठाकरे) आणि शिंदे गट सध्या एकमेकांचे कट्टर विरोधक बनले आहेत. त्यामुळे यंदा तिरूपती देवस्थानच्या सदस्यपदी नव्या नावाची शिफारस होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. भाजपकडून अमोल काळे यांची सदस्य पदी निवड केली आहे. काळे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. नव्या सदस्य निवडीची यादी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने​ नुकतीच यादी जाहीर केली आहे​.

हेही वाचा -

Chandrayaan 3 : चांद्रयान 3 मोहीमेपूर्वी इस्रोचे शास्त्रज्ञ तिरुपतीत बालाजी चरणी लीन; मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना

Tirupati Balaji: बालाजी मंदिरात महिला भाविकाने अर्पण केले अडीच कोटींचे दागिने

Tirumala Tirupati Devasthanam : तिरुमाला तिरुपती देवस्थान आज जारी करणार 'या' तारखेपर्यंतचे 300 रूपयांचे विशेष दर्शन टोकन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.