मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. राज्यपाल रमेश बैस यांनी पहिल्या दिवशी अभिभाषण केले. त्यापूर्वी आमदारांसाठी आरक्षित असलेल्या खुर्च्यांवर ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर बसल्याचे आमदार आदित्य ठाकरे यांना दिसून आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना, याबाबत जाब विचारतात नार्वेकरांना काढता पाय घ्यावा लागला. आदित्य ठाकरे यांनी थेट मिलिंद नार्वेकर यांनाच लक्ष केल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमध्ये चांगली चर्चा रंगली होती.
मिलिंद नार्वेकर: शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. नार्वेकरांशिवाय मातोश्री असो किंवा शिवसेना भवन वरून पान हलत नाही असे बोलेल जात होते. शिवसेनेतून आजवर बाहेर पडलेल्या अनेक नेत्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला होता. उद्धव ठाकरेंनी नार्वेकर यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना सातत्याने पाठीशी घातले. सेनेतून बाहेर पडलेल्या आणि यावरून उद्धव ठाकरे यांना सातत्याने खडे बोल सुनावले होते.
नार्वेकर टार्गेटवर: शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना घेऊन बंडखोरी केल्यानंतर सरकार अल्पमतात आले. एकदम विश्वासू असलल्याने ठाकरेंनी नार्वेकर यांना एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी सुरतमध्ये पाठवले. शिंदे यांनी ठाकरे यांचे आदेश फेटाळून लावले होते. राज्यात यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांनी देखील नार्वेकरांकडे अंगुलीनिर्देश केले होते.
नार्वेकर ठाकरे गटासोबत: राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर येतात. मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाच्या आमदारांच्या भेटीगाठी वाढवल्या. उद्धव ठाकरे यामुळे मिलिंद नार्वेकर यांच्यावर प्रचंड नाराज होते. त्यांनी नार्वेकर यांना चार हात लांब ठेवत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू रवी म्हात्रे यांच्याकडे सूत्रे दिली. नार्वेकर यानंतर शिंदे गटात जाणार अशी चर्चा रंगली होती. सोशल माध्यमातील अनेक पोस्ट त्यांच्या सूचक होत्या. मात्र नार्वेकर यांनी शिंदे गटात न जाता ठाकरे सोबत असल्याचे स्पष्ट केले.
नार्वेकर अर्थसंकल्पीय अधिवेशनात: राज्यपालांच्या अभिभाषणावेळी आज सभागृहातील आमदारांच्या आरक्षित खुर्च्यांवर मिलिंद नार्वेकर असल्याचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या निदर्शनास आले, त्यांनी ही बाब विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निदर्शने आणून जाब विचारला. मिलिंद नार्वेकर यानंतर सभागृहा बाहेर गेले. शिंदे गटातील नेत्यांची भेटीसाठी आणि दिवसभर विधानभवनात वावरताना दिसले. आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात दुरावा असल्याचे यावरून दिसून आले. आदित्य ठाकरे यांनीच अध्यक्षांना जाब विचारल्याने सभागृहातील शिवसेना सोडून गेलेल्या अनेक आमदारांनी आदित्य ठाकरे यांच्या कृतीचे समर्थन केले. दरम्यान, शिंदे गटातील आमदारांनी हीच संधी साधत, ते आमच्या सोबत असल्याचे सांगत नार्वेकरांची डोकेदुखी वाढवली आहे.