Bharat Decides 2019 : देशात 'फिर एकबार मोदी सरकार', एक्झिट पोलचा अंदाज
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली. २३ मे रोजी निकाल लागणार असून त्याआधी विविध एक्झिट पोल आपला अंदाज वर्तवत आहेत. विविध एक्झिट पोलच्या मतानुसार देशात पुन्हा एकदा मोदा सरकार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सी वोटरच्या सर्वेक्षणानुसार भाजप व मित्रपक्षांना २८७ तर काँग्रसेला १२८ तर इतरांना १२७ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
सविस्तर वृत्त
LOK SABHA ELECTION : सातव्या टप्प्यातील मतदान संपले, देशात सरासरी ६२.८७ टक्के मतदान; ७३.५१ टक्क्यांसह बंगाल आघाडीवर
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या ७ व्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज मतदान झाले. आज ७ राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात ५९ जागांसाठी मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ९१८ उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. देशात सरासरी मतदान ६०.२१ टक्के झाले.
सविस्तर वृत्त
एक्झिट पोलची चर्चा करुन ईव्हीएम बदलण्याचा डाव - ममता बॅनर्जी
कोलकाता - एक्झिट पोलवर चर्चा करुन ईव्हीएम मशीनमध्ये बदल करणे किंवा ते बदलण्याचा डाव असल्याचा आरोप ममता यांनी केला. हे युध्द एकत्र येऊनच जिंकता येणार आहे. यासाठी सर्व विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
सविस्तर वृत्त
जाणून घ्या, लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी गुगलसह फेसबुकवर किती केला खर्च
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांनी प्रचाराची सोशल मीडियावर रणधुमाळी उडविली आहे. राजकीय पक्षांनी गुगलसह फेसबुकवरील ऑनलाईन जाहिरातीसाठी फेब्रुवारी व मे दरम्यान ५३ कोटी खर्च केले आहेत. ही माहिती फेसबुक व गुगलच्या ऑनलाईन डॅशबोर्डवरून समोर आली आहे.
सविस्तर वृत्त
लग्नाला अजून एक महिनाही झाला नाही, अन् नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या
वाशिम - जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कुत्तरडोह येथील नवविवाहित महिलेने नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यांच्या लग्नाला एक महिनाही पूर्ण झाला नसताना विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त