ETV Bharat / state

MHADA lottery 2023 : मायानगरीतील 4082 फ्लॅटच्या चाव्या कुणाच्या हाती? मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज दुपारी सोडत

मायानगरीत घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असताना म्हाडाकडून आज अनेकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे काढण्यात येणाऱ्या येथील 4082 सदनिकांची सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते काढण्यात येणार आहे. ही सोडत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आज दुपारी २ वाजता काढण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

MHADA lottery 2023
म्हाडाच्या आज सोडत
author img

By

Published : Aug 14, 2023, 8:49 AM IST

Updated : Aug 14, 2023, 12:03 PM IST

मुंबई : शहरातील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहु, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथील 4,082 सदनिकांची परवडणाऱ्या दरात विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या या लॉटरीसाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ताडदेवमधील ७ कोटी किमतीच्या घरांसाठीच्या स्पर्धेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराडही सामील झाले असल्यामुळे या सोडतीकडे सर्वांचच लक्ष लागले आहे.

1 लाख 20 हजार 144 अर्ज पात्र - पहाडी गोरेगाव येथील प्रधानमंत्री आवास योजना, उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गट अशा विविध प्रकारांमध्ये म्हाडाने अर्ज मागविले होते. म्हाडातील घरांसाठी 1 लाख 20 हजार 144 अर्ज पात्र ठरले आहेत. गृहनिर्मिती क्षेत्रातील वाढत्या मागणीची पूर्तता करणे अवघड आहे. मात्र, हे अशक्य नाही. पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरात अधिकाधिक घरांची निर्मिती होऊ शकते. याकरता पुनर्विकास प्रकल्पांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायदे व नियमावलीमध्ये बदल करण्यासंदर्भात विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

सोडतीमधील पारदर्शकतेसाठी ऑनलाईन प्रक्षेपण - सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता म्हाडाकडून सोडतीचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात येणार आहे. अर्जदारांना 'वेबकास्टिंग' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीचे कामकाज पाहता येणार आहे. त्यासाठी म्हाडाचे ऑनलाईन प्रेक्षपण https://www.youtube.com/live/UsZDZUL3YyA?feature=share या लिंकवर तुम्ही पाहू शकता. म्हाडाने अर्जदारांकडून ऑनलाईन माहिती मागविल्याने यंदा म्हाडाच्या घरांची विक्रीची प्रक्रिया वेगवान पद्धतीने झाली आहे. विजेत्या अर्जदारांची यादी https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर सायंकाळी ६:०० वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.

एक खिडकी योजना - म्हाडा आज सोडतीच्या निकालानंतर घर वाटप प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सज्ज झाली आहे. घरांची सोडत निघाल्यानंतर विजेत्यांना कागदी तसेच इतर प्रक्रियेसाठी बँकांमध्ये कुठेही भटकावे लागणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. कारण मुद्रांक शुल्क तसेच नोंदणी शुल्क जमा करण्यासाठी अनेकवेळा फेऱ्या माराव्या लागतात. परंतु आता एकल खिडकी योजनेच्या धर्तीवर म्हाडाने आपल्या मुख्यालयात सर्व प्रक्रिया पार पाडण्याची व्यवस्था केली आहे.

म्हाडाच्या संथगतीचा यापूर्वी अर्जदारांना फटका - देवेंद्र फडणवीस यांनी पुणे म्हाडा महामंडळाला जानेवारी महिन्यात सहा हजार ६८ सदनिकांच्या वाटपासाठी मंजुरी दिली होती. यावेळी फडणवीस यांनी विजेत्यांना एका दिवसात मान्यतेचे पत्र दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतु म्हाडाच्या सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे विजेत्यांना फटका बसला. म्हाडाची लॉटरी लागूनही एकाही अर्जदाराला म्हाडाचे ऑफर लेटर मिळालेले नाही. त्यामुळे विजेत्यांमध्येही नाराजीचे वातावरण आहे. या प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी म्हाडाच्या कार्यालयाला भेट देऊन २५ एप्रिल २०२३ ला चौकशीची मागणी केली होती. दुसरीकडे तळेगावात 2020 मध्ये 600 सदनिका बांधण्यात आल्या असून अद्यापही नागरिकांना घराचा ताबा मिळाला नाही. याउलट बिल्डर नागरिकांकडे ५० हजार रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

हेही वाचा-

  1. MHADA lottery 2023 : मुंबईतील घराची प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी 4082 सदनिकांच्या विक्रीकरिता म्हाडाची निघणार सोडत
  2. High Court Orders : म्हाडा जमीन वाटप योजनेत दिव्यांगांसाठी आरक्षणाची तरतूद करा; नाहीतर एक लाखाचा दंड

Last Updated : Aug 14, 2023, 12:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.