ETV Bharat / state

Gunaratna Sadavarte: बार कौन्सिलने केलेल्या कारवाईबाबत वकील सदावर्ते यांना दिलासा नाही

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बार कौन्सिल यांच्याकडून महत्त्वाची शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेली आहे. याबाबत त्यांनी या कारवाईला स्थगिती मिळावी म्हणून उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने ही स्थगिती नाकारली. तसेच, त्यांच्या मुलीचा ड्रायव्हिंग करतानाचा वायरल झालेला व्हिडिओ बाबतची याचिका ती रद्द करत त्या प्रकरणात मात्र त्यांना दिलासा मिळाला आहे.

Gunaratna Sadavarte
Gunaratna Sadavarte
author img

By

Published : Mar 21, 2023, 3:54 PM IST

मुंबई : राज्यभरात महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांनी मोठा संप सुरू केला होता .आणि या संपाचं नेतृत्व त्यावेळेला आज सत्ताधारी असलेले गोपीचंदपडळकर सदाभाऊ खोत हे आमदार देखील करत होते. तसेच वकील गुनारत्न सदावर्ते यांनी देखील आझाद मैदानामध्ये संपकरांना आंदोलनामध्ये पाठिंबा दिला होता. आणि त्याबाबत ते स्वतः काळा कोट घालून आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलनाच्यावेळी त्यांनी घोषणा केली : या आंदोलनाच्या वेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी चितावणीखोर विधान केले आणि त्याचा परिणाम म्हणून आंदोलनावर परिणाम झाला. आणि लोक चिथावले गेले. आणि काही लोकांनी आत्महत्या देखील केल्या असा आरोप करण्यात आला होता. या आंदोलनाच्यावेळी त्यांनी घोषणा केली. त्याच्यानंतर गाणी म्हटले त्यासोबत लोकांच्या भावनांना हात घालणारी विधान केली आणि हे करत असताना त्यांनी वकिलांच्या संदर्भातला असलेला पेहराव तसाच ठेवला. आणि यामुळे बार कौन्सिलने त्यांच्याबाबत कारवाई केली होती.

वकिली पेशासाठी शोभनीय नाही : बार कौन्सिलने कारवाई करताना असा आरोप ठेवलेला आहे की, वकिलांसंदर्भातली जी आचारसंहिता आहे त्याचे जे मार्गदर्शक नियम आणि तत्व आहे त्याचे उल्लंघन गुणरत्न सदावर्ते यांनी सार्वजनिक ठिकाणी हजारो लोकांसमोर केलेले आहे. त्यामुळे हे वकिली पेशासाठी शोभनीय नाही आणि या बालकांसिलच्या कारवाईस स्थगिती मिळावी अशी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती.

नियमांना डावलता येणार नाही : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.एस.पाटील आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने याबाबत वकील गुनारत्न सदावर्ते यांच्यावर ताशेरे मारत फटकारे ओढत त्यांना सांगितले की, तुम्हाला लक्झरी वेळ पुन्हा पुन्हा इथे सुनावणीसाठी दिला जाणार नाही. तुमच्या बाबतची शिस्तभंगाची कारवाई सुरूच राहील. तुम्हाला शिस्तभंगाच्या नियमांना डावलता येणार नाही, हे लक्षात घ्या. तसेच, तुमच्या मुली संदर्भातला व्हायरल व्हिडिओ बाबतची केस मात्र रद्द होत आहे.

इंडियाच्या कारवाईबाबत स्थगिती : आता वकील गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने आज खडसावल्यानंतर ते शांतपणे न्यायालयाचे म्हणणे ऐकत होते. तुमच्यावरील शिस्तभंगाची कारवाई सुरूच राहील. त्याला, स्थगिती आम्ही देणार नाही. फक्त तुमच्या मुलीने कार चालवली याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला. त्याबाबतची याचिका आम्ही रद्द करत आहोत, याचा अर्थ शिस्तबंगाची कारवाई स्थगित झाली असा नाही हे लक्षात घ्या, असे देखील न्यायालयाने अधोरेखित केले आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने बार कौन्सिल इंडियाच्या कारवाईबाबत स्थगिती नाकारल्याने आता या कारवाईपासून गुणरत्न सदावर्ते यांची सुटका नाही हे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : Nitin Gadkari Threat Call : नितीन गडकरींच्या संपर्क कार्यालयात पुन्हा धमकीचे फोन; सुरक्षेत वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.