मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कडून नोकर भरती करताना गट क साठीचे पदभरती एमपीएससी मार्फत करण्याचा शासनाने निर्णय (post of Clerk will Recruit) घेतला. त्याबाबतचा आदेश देखील प्रसृत करण्यात आला (MPSC) आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग : महाराष्ट्र राज्य शासनाच्या कोणत्या विभागातील कारकून अर्थात लिपिक म्हणजेच गट क मधील टंकलेखक किंवा त्यासारखी पदे याच्या आधी राज्याच्या दुय्यम सेवा निवड मंडळाकडून भरली जात होती. नामनिर्देशनाच्या खोट्यातील गट ब व गट क आणि गट ड संवर्गातील सरळ सेवा पदभरती जिल्हा तथा प्रादेशिक आणि राज्यस्तराच्या निवड समितीच्या माध्यमातून केली जात होती. आता ती देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केली जाणार आहे.
निर्णय पारित : शासन लिपिकाची पदे म्हणजे गट श्रेणीमधील ही पदे अर्थात लोकप्रिय नाव कारकून ही पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा भरण्याचा विचार करत होते. त्यानुसार बुधवारी शासनाने निर्णय पारित केला. पहिल्या खेपेत मुंबई महानगरपालिका आणि त्या बाहेरील लिपिक टंकलेखक पदांची भरती होणार (mh goverment decision) आहे.
मागणी पत्र : शासनाच्या निर्णयात हे देखील नमूद आहे की- मंत्रालयातील प्रशासकीय विभागाने त्यांच्या कार्यक्षेतील सर्व क्षेत्रीय कार्यालयातील गट क मधील सरळसेवेने जी पदे भरावयाची आहे. त्या पदांचे मागणी पत्र त्यांनी त्वरित मागवावे, हे मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यासाठी शासनाचे विभागाचे सहसचिव किंवा उपसचिव स्तरावरील समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक (post of Clerk will Recruit through MPSC) करावी.