ETV Bharat / state

Transfers of IPS officers :अखेर शिंदे फडणवीसांमध्ये समझोत्या नंतर निघाले आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश - शिंदे फडणवीसांमध्ये समझोता

राज्य सरकारने गुरुवारी रात्री 24 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी (Mh Goverment issued Transfer orders) केले. गेल्या काही दिवसांपासून आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या रखडल्या (issued Transfer orders of IPS officers) होत्या.

Transfers of IPS officers
आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी
author img

By

Published : Oct 21, 2022, 1:42 PM IST

मुंबई : गेल्या महिन्याभरात 64 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर राज्य सरकारने गुरुवारी रात्री 24 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी (Mh Goverment issued Transfer orders) केले. गेल्या काही दिवसांपासून आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या रखडल्या (issued Transfer orders of IPS officers) होत्या.

राजकारणामुळे रखडल्याची चर्चा : मुंबईतील पोलीस उपआयुक्त निलोत्पल यांची गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक म्हणून अनुक्रमे धनंजय कुलकर्णी आणि पवन बनसोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राजकारणामुळे रखडल्या होत्या. ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता वेध लागले आहेत. ते महानगरपालिकांच्या निवडणुकांचे याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने या बदल्या केल्या असल्याची चर्चा (Transfer orders of IPS officers) आहे.

आरोप प्रत्यारोपाला उधाण : नुकतेच फोन टायपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना देखील क्लीन चीट मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून राजकारणात आरोप प्रत्यारोपाला देखील उधाण आले आहे. बऱ्याचदा सत्ताधारी आपल्या मर्जीतील आयपीएस अधिकाऱ्याला चांगल्या ठिकाणी बदली दिली जाते. सध्या तरी पहिल्या टप्प्यातील 24 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असल्या तरी इतर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या अजून शिल्लक आहेत.

बदल्यांबाबत एकमत : राज्यात अलीकडे सनदी अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल झाल्या असल्या तरी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अजूनही मुहूर्त भेटलेला नव्हता. यावरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजगी सुद्धा दिसून येत होता. विशेष म्हणजे या बदल्यांवरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरू झाल्या होत्या. पोलिसांच्या बदल्यांबाबत दोघांमध्ये एकमत झाल्याने या बदल्या काल झाल्या आहेत, असेही समजत (Mh Goverment issued) आहे.

शिंदे-फडणवीस नाराजी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी देखील राज्याचे उपमंत्रीपद आणि गृहमंत्री पद भूषवलेले असल्याने त्यांना आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत खोलवर माहिती आहेत. फडणवीस यांचा वापर सध्या सुपरसीएम सारखाच आहे हे सुद्धा शिंदे यांना खटकत आहे. म्हणूनच, सध्याच्या राजकारणात 'तेरी भी चूप और मेरी भी चूप', असं हे म्हणत असले तरी या दोघांमधील नाराजगी असली तरी पहिल्या टप्प्यातील बदल्या करण्यात आल्या (Transfers of IPS officers) आहेत.

अशा झाल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या : महाराष्ट्र शासनाने राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ( Transfers of IPS Officers in the State ) काल केलेल्या आहे. काही दिवसांपूर्वी देखील शिंदे फडणवीस ( Shinde Fadnavis Govt ) शासनाने भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. आता या भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या याबद्दलचा शासन निर्णय गृह विभागाने आजच जारी केलेला ( Transfers IPS Officer ) आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम २२न यामधील तरतुदींनुसार, पुढील तक्त्यातील स्तंभ (२) मध्ये नमूद भा.पो.से./रा.पो.से. अधिका-यांची, स्तंभ (३) मध्ये नमूद पदांवरुन, स्तंभ (४) मध्ये निर्दिष्ट पदांवर, याद्वारे, बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.