ETV Bharat / state

महाराष्ट्र कोरोना : राज्यात ६,०५९ नवीन रुग्ण, ११२ रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना न्यूज

राज्यात आज ११२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण ४३,२६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Oct 25, 2020, 10:26 PM IST

मुंबई - राज्यात आज ५ हजार ६४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे कोरोनावर मात करून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा १४ लाख ६० हजार ७५५ वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.८ टक्क्यांवर पोहोचले आहे. दिवसभरात राज्यात आज ६ हजार ५९ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्यादेखील कमी होऊन १,४०,४८६ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

  • राज्यात आज 6059 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5648 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1460755 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 140486 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.8% झाले आहे.#CoronaVirusUpdates

    — Rajesh Tope (@rajeshtope11) October 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८६,०८,९२८ नमुन्यांपैकी १६,४५,०२० नमुने पॉझिटिव्ह (१९.११ टक्के) आले आहेत. राज्यात २५,१८,०१६ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या १३,५७२ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात आज ११२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण ४३,२६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.