ETV Bharat / state

मनोरुग्णाने घेतला पोलिसाच्या बोटाचा चावा; नागपाड्यातील घटना

एक मनोरुग्ण रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना शिवीगाळ करत असल्याची माहिती पोलीस शिपाई जनार्दन साखरे यांना मिळाली होती. त्यानंतर ते घटनास्थळी गेले असता मनोरुग्णाने त्यांच्या बोटांचा चावा घेतला.

nagpada police station
मनोरुग्णाने घेतला पोलिसाच्या बोटाचा चावा; नागपाड्यातील घटना
author img

By

Published : Feb 13, 2020, 11:00 AM IST

मुंबई - गजबजलेल्या नागपाडा परिसरात बुधवारी रस्त्यावर नग्न अवस्थेत चालत नागरिकांना शिव्या देणाऱ्या मनोरुग्णास समज देण्यासाठी पोलीस शिपाई गेला होता. यावेळी मनोरुग्णाने पोलीसाच्या बोटाचा चावा घेऊन जखमी केल्याची घटना समोर आली आहे.

हेही वाचा -

दिल्लीचे दरोडेखोर नाशिकमध्ये जेरबंद, चौकशीत 10 घरफोडींच्या घटनेची उकल

नागपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई जनार्दन साखरे यांना एक मनोरुग्ण रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना शिवीगाळ करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर हे शिपाई घटनास्थळी गेले व त्या मनोरुग्णास अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनोरुग्णाने पोलीस शिपायाच्या हाताला धरून त्याच्या डाव्या हाताच्या बोटाचा चावा घेतला. या घटनेनंतर जनार्दन साखरे यांना जेजे रुग्णालयात दाखल करून त्यांच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलीस शिपायाच्या बोटाचा चावा घेणारा मनोरुग्ण हा स्वतः पळत नागपाडा पोलीस ठाण्यात आला होता. पोलिसांनी या मनोरुग्णाला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याचे नाव मोहम्मद शकील शब्बीर हुसेन सलमानी (वय-45) असे असून त्याच्यावर 2016 पासून उपचार सुरू असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या संदर्भात गुन्हा नोंदवून मनोरुग्णास जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

हेही वाचा -

कल्याणमध्ये गावठी पिस्तुलांसह 2 आरोपी जेरबंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.