ETV Bharat / state

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

author img

By

Published : Aug 25, 2019, 1:11 PM IST

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे आज फेऱ्या कमी चालविण्यात येतील.

ध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई - आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे आज फेऱ्या कमी चालविण्यात येतील. मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे दरम्यान सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर आज सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत कल्याणहून सीएसएमटी दिशेकडे येणाऱ्या लोकल कल्याण ते ठाणेदरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील.

सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ पर्यंत सीएसएमटीहून कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल संबंधित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा या स्थानकांवर थांबा घेतील. हार्बर मार्गावरील कुर्ला आणि वाशीदरम्यान दोन्ही दिशेकडे सकाळी ११.१० ते ३.४० पर्यंत एकही लोकल धावणार नाही. सकाळी १०.३४ ते दुपारी ३.०८ वाजेपर्यंत सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेलकडे व सकाळी १०.२१ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीकडे एकही लोकल धावणार नाही. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते पनवेल-वाशी, कुर्लादरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते भाईंदर या स्थानकादरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. आज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बोरीवली ते भाईंदर यादरम्यान दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान दोन्ही दिशेकडील जलद मार्गावरील लोकल विरार, वसई रोड ते बोरीवलीपर्यंत धिम्या मार्गावरून चालविण्यात येतील.

Intro:मुंबई - मध्य,आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे.. परिणामी, आज फेऱ्या कमी चालविण्यात येतील. Body:मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे दरम्यान सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर आज सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत कल्याणहून सीएसएमटी दिशेकडे येणाऱ्या लोकल कल्याण ते ठाणेदरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील.

सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ पर्यंत सीएसएमटीहून कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल संबंधित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा या स्थानकांवर थांबा घेतील.
हार्बर मार्गावरील कुर्ला आणि वाशीदरम्यान दोन्ही दिशेकडे सकाळी ११.१० ते ३.४० पर्यंत एकही लोकल धावणार नाही. सकाळी १०.३४ ते दुपारी ३.०८ वाजेपर्यंत सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेलकडे व सकाळी १०.२१ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पनवेल ,बेलापूर ,वाशीहून सीएसएमटीकडे एकही लोकल धावणार नाही. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते पनवेल-वाशी, कुर्लादरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतीलConclusion:पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते भाईंदर या स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. आज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बोरीवली ते भाईंदर यादरम्यान दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान दोन्ही दिशेकडील जलद मार्गावरील लोकल विरार, वसई रोड ते बोरीवलीपर्यंत धिम्या मार्गावरून चालविण्यात येतील.
 
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.