ETV Bharat / state

Measles in Mumbai : सहा महिन्यांपासून बालकांना गोवरची लस द्या, केंद्राचे राज्याला निर्देश - केंद्रीय आरोग्य

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गोवर या संसर्गजन्य आजाराचा उद्रेक झाला आहे. लस न झालेल्या मुलांमध्ये याचा प्रसार अधिक असल्याचे समोर आले आहे. मुंबईत आतापर्यंत 12 बालकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सहा महिन्यांच्या मुलांना गोवरची लस देण्याचे तसेच नऊ महिन्यांवरील बालकांना गोवरच्या लसचा अतिरिक्त डोस देण्यात यावा असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. (Vaccinate children from six months, Measles in Mumbai)

Measles in Mumbai
मुंबईत गोवरचा उद्रेक
author img

By

Published : Nov 24, 2022, 10:58 AM IST

मुंबई: मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गोवर या संसर्गजन्य आजाराचा उद्रेक झाला आहे. लस न झालेल्या मुलांमध्ये याचा प्रसार अधिक असल्याचे समोर आले आहे. (Vaccinate children from six months, Measles in Mumbai)

केंद्राचे राज्य सरकारला आदेश: जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) आणि युनिसेफने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये गोवर आणि रूबेला चा पहिला डोस 89 टक्के तर दुसरा डोस 82 टक्के बालकांनी घेतलेला आहे. डिसेंबर 2023 पर्यंत गोवर आणि रूबेला चे पूर्णतः निर्मूलन करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे ठरवलेली आहेत.

देशामध्ये गोवरच्या वाढत्या रुग्णांची: देशामध्ये गोवरच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता 23 नोव्हेंबर रोजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने निती आयोग, जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया प्रांताचे अधिकारी आणि भारतातील जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत ज्या विभागांमध्ये गोवरची साथ मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे, तेथे नऊ महिने ते पाच वर्षांमधील मुलांना लसीचा अतिरिक्त डोस देण्यात यावा. तसेच ज्या भागामध्ये गोवरच्या रुग्णांपैकी दहा टक्के रुग्ण हे नऊ महिन्यांपेक्षा कमी वयाचे असतील अशा भागात सहा महिने ते नऊ महिन्यांपर्यंतच्या मुलांना गोवरचा लस देण्यात यावी, असे आदेश केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव पी. अशोक बाबू यांनी राज्य सरकारला दिले आहेत. देशामध्ये बिहार, गुजरात, झारखंड, केरळ, महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोवरची साथ पसरलेली आहे.

12 बालकांचा मृत्यू: मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत एकूण 233 रुग्णांची तर 3534 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. भिवंडी ठाणे येथील एका 8 महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 12 झाला आहे. 12 पैकी 9 मृत्यू मुंबईतील तर 3 मृत्यू मुंबई बाहेरील आहे. 26 रुग्ण ऑक्सीजनवर, 5 रुग्ण आयसीयुमध्ये तर 2 रुग्ण व्हेंटिलेटवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. केंद्र सरकारकडून आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अमलबजावणी करून आम्ही लसीकरण वाढवण्यावर भर देऊ, अशी प्रतिक्रिया मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी दिली आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सूचना : 1 - गोवरची साथ नोव्हेंबर ते मार्च महिन्यापर्यंत आढळते. त्यामुळे संशयित रुग्ण तातडीने शोधावेत. 2 - गोवरचा उद्रेक झालेल्या भागांत 5 ते 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना अतिरिक्त लसीसह गोवरच्या दोन्ही मात्रांच्या लसीकरणाची मोहिम योग्य पद्धतीने राबवावी. 3 - गोवरची साथ आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या पुढाकाराने जिल्हा टास्क फोर्सची स्थापना करुन दर दिवसाला आणि प्रत्येक आठवड्याला लसीकरण मोहिमेची माहिती घ्यावी. 4 - हा आजार कमी वजनाच्या बालकांना किंवा कुपोषित मुलांना पटकन होतो. त्यामुळे या मुलांचा शोध घेऊन सकर आहार तसेच अ जीवनसत्त्वाच्या गोळ्या दिल्या जाव्यात. 5 - निदान झालेल्या रुग्णांना आठवडाभर रुग्णालयात आयसोलेशन विभागात उपचार दिले जावेत. घरगुती उपचारांच्यावेळी अ जीवनसत्व, लसीच्या दोन्ही मात्रा तसेच सकस आहाराकडे लक्ष द्यावे. 6 - जुलाब, श्वसनाचा त्रास तसेच छातीत दुखत असल्यास रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.