मुंबई : कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी आणि मंदिरे यामध्ये मास्कसक्ती करण्याबाबत केंद्र सरकारने आवाहन केले ( Central government appeals for masks compulsory )आहे. याबाबतचे परिपत्रक अद्याप निघाले नसले तरी राज्यातील महत्वाच्या मंदिरांमध्ये मास्कसक्ती केली जात आहे. तसेच मुंबईतील मुंबादेवी मंदिरात मास्क अनिवार्य करण्यात आला असून सिद्धिविनायक मंदिरात अद्याप मास्क सक्ती केली नसल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले.
दक्षतेची खबरदारी : कोरोनाची चौथी लाट जगभरात पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील काही महत्त्वाच्या देवालयांमध्ये मास सक्ती करण्यास सुरुवात झाली आहे या पार्श्वभूमीवर अत्यंत गजबजलेल्या आणि पर्यटकांचा सतत राबता असलेल्या मुंबईतील मुंबादेवी आणि सिद्धिविनायक या दोन मंदिरांमध्येही दक्षता घेण्याचे काम सुरू झाले आहे.
सिद्धिविनायक मंदिरात आरोग्य तपासणी : राज्य सरकारने अद्याप मंदिरांमध्ये मास्क सक्ती बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत राज्य सरकारचा मास्क सक्ती बाबतचा निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही मास्क सक्ती भाविकांना करणार नाही अशी माहिती सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे. मात्र मंदिरातील सर्व पुजाऱ्यांची आरोग्य तपासणी आपण करीत ( Priests Health Checkup at Siddhivinayak Temple ) असून भाविकांची ही तपासणी करण्याबाबत विचार असल्याचे बांदेकर यांनी सांगितले.
मुंबादेवी मंदिरात मास्कसक्ती : दरम्यान मुंबईतील मुंबादेवी या प्रसिद्ध मंदिरात मास्क सक्ती करण्यात ( Masks compulsory in Mumbadevi temple )आली आहे. मंदिरातील 75 पुजारी मास्क लावून सेवा बजावत आहेत तर मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाने मास्क वापरले पाहिजे अशी आम्ही सक्ती केली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी दक्ष राहिला पाहिजे असे गिरीश घोलप आणि मंदिर व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी सांगितले.
शिर्डी साईबाबा मंदिारात मास्कसक्ती : शिर्डी येथील साई मंदिर देवस्थाने भाविकांना मंदिर मध्ये प्रवेश करत असताना मास्क सक्तीचा केला आहे. तर, दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनेही त्या संदर्भात दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. याबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी अधिकची माहिती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर आज शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळ पासून मंदिरात काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना मास्क सक्तीचा केले आहे. मात्र भाविकांना अद्याप मास्कची सक्ती करण्यात आली नाही. भाविकांना मास्कची सक्ती करण्यात आली नसली तरीही, भाविकांनी मात्र मास्कचा वापर करावा (distribution of masks to devotees) असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे. त्यासाठी खबरदारी म्हणून मंदिराच्या प्रवेशद्वारावर भाविकांना मास्कचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली आहे.
अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांसाठी मास्कसक्ती : कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरात दि. २२ डिसेंबरपासुन कर्मचाऱ्यांसाठी मास्कसक्ती करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला आहे. माञ भाविकांना मास्कसक्ती करण्यात आलेली नाही. करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई)च्या मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.तसेच देशात बीएफ-७ हा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण सापडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे देवस्थान समितीकडून सागण्यात आले आहे. कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरातील पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना दि. २२ डिसेंबरपासुन मंदिरात मास्कसक्ती करण्यात आली आहे.
दगडूशेठ हलवाई गणपती मास्क लावण्याचे आवाहन : भारतातली मागील वेळेची कोरोनाची स्थिती पाहता यावेळी विशेष काळजी घेतली जात आहे. याबाबतील पुन्हा खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली ( Trust appeal wear mask to Darshan ) आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर प्रशासनाने देखील खबरदारी घेत भक्तांना बाप्पाच्या दर्शनासाठी येताना मास्क वापरावे असे आवाहन केले ( Corona patient increases ) आहे. चीनसह इतर देशांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जरी सरकारकडून काहीही निर्बंध लावले गेले नसले, तरी खबरदारी म्हणून पुण्यातील श्रीमंत दगडु हलवाई गणपती मंदिर प्रशासनाने मंदिरात येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी येताना मास्क परिधान करावा असे आवाहन करण्यात आले. ( Dagdusheth Halwai Ganapati ) आहे.