मुंबई: एका 19 वर्षीय विवाहित तरुणीवर अज्ञाताने चाकूच्या धाकावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी बलात्काराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी धारावी पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणी त्या नराधमा विरुध्द भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 376,376 (डी),425, 354,(ए) 354(बी), 354(डी), 506(2), भादवि सह कलम 67,67 (अ),66(इ ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धारावी परिसरात तक्रारदार 19 वर्षीय तरुणी सासरच्या मंडळींसोबत राहते. मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास तरुणी घरात झोपली असताना, तिचे सासरे दरवाजा न लावता घराबाहेर पडले. दोन अज्ञात व्यक्ती घरात घुसल्या. आरोपींनी चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार केला. यावेळी एका आरोपीने या घटनेचे चित्रीकरण केले. आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर रुमाल बांधल्याचे विवाहितेने पोलिसांना सांगितले.