ETV Bharat / state

Marathi Artists Insult : भाजपकडून मराठी कलाकारांचा अपमान; राजकारण तापले

author img

By

Published : Oct 20, 2022, 7:14 PM IST

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ( Diwali Festival ) मराठमोळा दीपोत्सव कार्यक्रमाचे ( Dipotsav program ) आयोजन वरळीत करण्यात आले( Organization of Marathmola Dipotsav program ) आहे. आगामी मनपा निवडणुकीत भाजपचा ( Organized Deepotsav program on behalf of BJP ) मराठी मतांवर डोळा आहे.

Shiv Sena leader Sachin Ahir
Shiv Sena leader Sachin Ahir

मुंबई - वरळीत भाजपच्या वतीने दिवाळीच्या ( Diwali Festival ) पार्श्वभूमीवर मराठमोळा दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन ( Organization of Marathmola Dipotsav program ) केले आहे. आगामी मनपा निवडणुकीत भाजपचा ( Organized Deepotsav program on behalf of BJP ) मराठी मतांवर डोळा आहे. मात्र, याच मराठी माणसातील कलाकाराचा भाजपच्या आमदाराने भर कार्यक्रमात उत्तर भाषिक अभिनेत्यासाठी घोर अपमान केला. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते सचिन अहिर ( Shiv Sena leader Sachin Ahir ) यांनीही ट्विटवरुन भाजपवर जोरदार टीकास्त्र ( Sachin Ahir criticizes BJP ) सोडले. तसेच हाच का मराठी कलाकारांचा सन्मान, असा थेट सवालही विचारला.

हाच का मराठी कलाकारांचा सन्मान....!!!!

भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी येथे
मराठी कलाकारांची चेष्टा........@abpmajhatv @TV9Marathi @saamTVnews @JaiMaharashtraN @zee24taasnews @ANI @ShivsenaComms pic.twitter.com/f7HxpcFbUV

— Sachin Ahir (@AhirsachinAhir) October 20, 2022

मराठमोळा दीपोत्सवाचे आयोजन- मुंबई मनपात सत्ता आणण्यासाठी भाजपने चंग बांधला आहे. राज्यात ठिकठिकाणी मराठमोळा दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. बुधवारी वरळीच्या जांबोरी मैदानावर भाजपच्या मराठमोळा दीपोत्सव कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहिल्या दिवशी संगीतोत्सवाच्या कार्यक्रम आयोजित केला होता. राष्ट्रीय पुरस्कार विजेता गायक राहुल देशपांडे यांचा ही कार्यक्रम या ठिकाणी होणार होता. परंतु, राहुल देशपांडे यांचे गायन सुरु असतानाच बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आल्याने त्यांना कार्यक्रम थोडा वेळ थांबवण्यास सांगितले.

टायगर श्रॉफचा सत्कार - देशपांडे यांनी वीस मिनिटात कार्यक्रम संपवतो. मग तुम्ही तुमचा कार्यक्रम करा, अन्यथा मी उठतो असे सूचित केले. अभिनेता पुष्कर श्रोत्री यांना ही बाब कळवली. तसेच आमदार मिहीर कोटेचा यांनाही तसा निरोप दिला. परंतु, त्यांनी देशपांडे यांची सुचना अमान्य करत, टायगर श्रॉफचा सत्कार कार्यक्रम कोटेचा यांनी सुरु केला. हा एका मराठी कलाकाराचा अवमान केल्याप्रकरणी शिवसेनेने आवाज उठवला आहे. तसेच या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाला असून सचिन अहिर यांनी यावरुन भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

भाजपवर जोरदार निशाणा - अहीर म्हणाले की, हाच का मराठी कलाकारांचा सन्मान, भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी येथे मराठी कलाकारांची चेष्टा, अशी टीका त्यांनी केली आहे. या आगोदर हे उत्सव भाजपने का नाही केले. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे कार्यक्रम आयोजित केले जात आहे. नंतर कुठे हे दिसत नाहीत, असेही अहिर म्हणाले. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही अहिर यांचे ट्विट रिट्विट करत मानापमान? असे लिहीत भाजपला खडे बोल सुनावले आहेत.

मुंबई - वरळीत भाजपच्या वतीने दिवाळीच्या ( Diwali Festival ) पार्श्वभूमीवर मराठमोळा दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन ( Organization of Marathmola Dipotsav program ) केले आहे. आगामी मनपा निवडणुकीत भाजपचा ( Organized Deepotsav program on behalf of BJP ) मराठी मतांवर डोळा आहे. मात्र, याच मराठी माणसातील कलाकाराचा भाजपच्या आमदाराने भर कार्यक्रमात उत्तर भाषिक अभिनेत्यासाठी घोर अपमान केला. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते सचिन अहिर ( Shiv Sena leader Sachin Ahir ) यांनीही ट्विटवरुन भाजपवर जोरदार टीकास्त्र ( Sachin Ahir criticizes BJP ) सोडले. तसेच हाच का मराठी कलाकारांचा सन्मान, असा थेट सवालही विचारला.

मराठमोळा दीपोत्सवाचे आयोजन- मुंबई मनपात सत्ता आणण्यासाठी भाजपने चंग बांधला आहे. राज्यात ठिकठिकाणी मराठमोळा दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. बुधवारी वरळीच्या जांबोरी मैदानावर भाजपच्या मराठमोळा दीपोत्सव कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहिल्या दिवशी संगीतोत्सवाच्या कार्यक्रम आयोजित केला होता. राष्ट्रीय पुरस्कार विजेता गायक राहुल देशपांडे यांचा ही कार्यक्रम या ठिकाणी होणार होता. परंतु, राहुल देशपांडे यांचे गायन सुरु असतानाच बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आल्याने त्यांना कार्यक्रम थोडा वेळ थांबवण्यास सांगितले.

टायगर श्रॉफचा सत्कार - देशपांडे यांनी वीस मिनिटात कार्यक्रम संपवतो. मग तुम्ही तुमचा कार्यक्रम करा, अन्यथा मी उठतो असे सूचित केले. अभिनेता पुष्कर श्रोत्री यांना ही बाब कळवली. तसेच आमदार मिहीर कोटेचा यांनाही तसा निरोप दिला. परंतु, त्यांनी देशपांडे यांची सुचना अमान्य करत, टायगर श्रॉफचा सत्कार कार्यक्रम कोटेचा यांनी सुरु केला. हा एका मराठी कलाकाराचा अवमान केल्याप्रकरणी शिवसेनेने आवाज उठवला आहे. तसेच या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाला असून सचिन अहिर यांनी यावरुन भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

भाजपवर जोरदार निशाणा - अहीर म्हणाले की, हाच का मराठी कलाकारांचा सन्मान, भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी येथे मराठी कलाकारांची चेष्टा, अशी टीका त्यांनी केली आहे. या आगोदर हे उत्सव भाजपने का नाही केले. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे कार्यक्रम आयोजित केले जात आहे. नंतर कुठे हे दिसत नाहीत, असेही अहिर म्हणाले. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही अहिर यांचे ट्विट रिट्विट करत मानापमान? असे लिहीत भाजपला खडे बोल सुनावले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.