मुंबई: मराठा आरक्षणाची मागणी राज्यभरातून होत असताना मोठी बातमी समोर आली आहे. जालना येथील तरुणानं मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली. सुनिल बाबुराव कावळे ( रा. चिकनगाव ता. अंबड जि. जालना) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तरुणाचा मृतदेह सायन रुग्णालयात असल्याची माहिती समोर येत आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील हे कालपासून (बुधवारी) मुंबई दौऱ्यावर आहेत. आज ते नवी मुंबईसह अनेक शहराचा दौरा करणार आहेत. यापूर्वी मनोज जरांगे-पाटील यांनी 150 एकर जागेवर लाखोंची सभा घेतली. एकीकडं मराठा आरक्षणासाठी लाखोंचे शांततेत मोर्चे पार पडले. तर दुसरीकडं मराठा युवकानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या घेतली आहे.
-
आज जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली.
— Vinod Patil (@vnpatilofficial) October 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
माझ्या मराठा बांधवांनो,
आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका. लढाई…
">आज जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली.
— Vinod Patil (@vnpatilofficial) October 19, 2023
माझ्या मराठा बांधवांनो,
आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका. लढाई…आज जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली.
— Vinod Patil (@vnpatilofficial) October 19, 2023
माझ्या मराठा बांधवांनो,
आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका. लढाई…
आत्महत्या करण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी- सुनिल कावळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार पानांची चिठ्ठी लिहिली आहे. महाराष्ट्राचे कुळदैवत तुळजाभवानीमाता, हिंदूधर्म रक्षक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा... जय भवानी... शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या भविष्याचा प्रश्न आहे. मराठी शेतकरी, मुला-मुलींच्या शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे. या मुंबईमध्ये सणवार काय येत राहतील, जात राहतील.
सर्वांना मुंबईत येण्याचं केलं आवाहन- संपूर्ण महाराष्ट्रातून मराठ्यांनो २४ ऑक्टोबरला मुंबईत या... आता ही लढाई जिंकायची आहे. शाळेतील मुल-मुली या कॉलेजमधील या...चार दिवस शाळेत गेला नाहीतरी काही फरक पडत नाही. पण आता ही लढाई आरपार आहे. मला माफ करा..., आता एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा... लाख मराठा..., आता कोणत्या नेत्याच्या सभेला जायचंच नाही, हा लढा गरजवंताचा, लढा नीतीवंत मराठ्यांचा आणि लढा शौर्यवंताचा असल्याचं आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलयं. मला मोठ्या मनानं माफ करा. मी क्षमा मागतो. सर्वांनी माफ करा, असेही आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.
मृताचे नातेवाईक मुंबईत दाखल..आज पहाटे सुनिल कावळे यांचा मृतदेह सायन रुग्णालयात आणण्यात आला. सध्या जालन्याहून कावळेंचे नातेवाईक आले आहेत. मृताची ओळख तसेच अन्य प्रक्रिया रुग्णालयाकडून सुरू असल्याची माहिती रुग्णालयातील सुत्रांनी दिली आहे. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात येईल असंदेखील सांगण्यात आलं आहे.
आत्महत्या करणारा तरुण मराठा आंदोलनात होता सक्रिय- मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी मराठा तरुणानं आत्महत्या केल्यानंतर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, हुतात्मा सुनील बाबुराव कावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सुनील बाबुराव कावळे हा युवक सक्रिय होता. त्यानं मुंबईत आत्महत्या केली. मात्र, आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. माझ्या मराठा बांधवांनो, काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीनं यापूर्वी इतिहासात जिंकले आहेत.
अन्यथा उद्रेक अटळ- खचून विशेषत: लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका! यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. अशा परिस्थितीत मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. अशी राज्य सरकारला विनंती आहे. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाही, अशी विनोद पाटील यांनी राज्य सरकावर टीका केली. मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी, अशी मागणी क्रांती मोर्चाचे समन्वयक पाटील केली आहे. अन्यथा उद्रेक अटळ असल्याचा इशारादेखील विनोद पाटील यांनी दिला.
हेही वाचा-