मुंबई: : राज्यभरात मराठा आंदोलकांकडून कँडल मोर्चा, साखळी उपोषण आणि प्रवेश बंदीचे बॅनर उभारण्यात येत आहेत. या आंदोलनाचे लोण आता मुंबईत पसरले असून पवई, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन केली जात आहेत.
Live Updates:
- मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याकरिता आज पुणे मार्केट यार्ड बंद ठेवण्यात येणार आहे. व्यापारी व आडतदारांनी हा बंद पुकारला आहे.
- दोन अज्ञात व्यक्तींकडून आकाशवाणी आमदार निवासाबाहेरील गाड्यांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
पवईतील पंचकुटीर तसेच तिरंदाज गांवठाण या परिसरात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचे मराठा समाजाकडून फलक लावण्यात आले आहेत. त्याचवेळी १ नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे पवईतील सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आले. मंगळवारी सकाळीच पंचकुटीर परिसरात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचा फलक झळकाविण्यात आला. तर सायंकाळी तिरंदाज व्हिलेज वस्तीच्या प्रवेशद्वारावर प्रवेश बंदीचा फलक लावण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं मराठा समाजातील ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण उपस्थित होते.
प्रवेश बंदीचे झळकले बॅनर- आरक्षण मागणीसाठी मुंबईत ठिकठिकाणी आंदोलनाच्या हालचाली केल्या जात आहेत. पवईतील पंचकुटीर तसेच तिरंदाज गांवठाण या परिसरात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचे बॅनर झळकविण्यात आले आहेत. जरांगे-पाटील यांच्या शांततेत आंदोलनाच्या आवाहनाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पवईतील सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आले.
मराठा आरक्षण देणं लांबल्यानं तीव्र जनआक्रोश- आंदोलनात कसे सहभागी होता येईल यावर विचार करत असल्याचे मराठा आंदोलक पंकज लाड यांनी सांगितले. पवईत झालेल्या बैठकीत गजानन पवार, आनंद घोरपडे, अविनाश थोपटें, निलेश येवले, मनिष गावडे, बाळू कहडणे, संभाजी मिसाळ, विजय शिवाजी कानसकर आदी उपस्थित होते. बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देणे लांबविण्यात येत असल्यानं तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यावर हा जनआक्रोश उसळत असल्याचं सांगण्यात आलं.
पुण्यात साखळी उपोषण- मराठा आरक्षणासाठी राज्यभरात तीव्र आंदोलन होताना दिसत आहे. पुण्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय साखळी उपोषण करण्यात आले. पुण्यातील मोदी गणपती समोरील भरत मित्र मंडळ येथील चौकात भाजप आणि शिंदे गट वगळता सर्व पक्षीय नेते मंडळी तसेच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून साखळी उपोषण करण्यात आले. तर कोंढवा येथे मुस्लिम बांधवांच्या वतीनं कोंढवा येथं साखळी उपोषण करण्यात आलं.
हेही वाचा-