ETV Bharat / state

Maratha Reservation Issue: मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी सरकारला वेळ देतील - संजय शिरसाट - Sanjay Shirsat On Maratha Reservation

Maratha Reservation Issue : मराठा आरक्षण प्रश्नी (Sanjay Shirsat On Maratha Reservation) सरकार अतिशय सकारात्मक असून मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, सरकारला थोडा वेळ आवश्यक आहे. हा वेळ निश्चितच जरांगे पाटील देतील, (Sanjay Shirsat On Jarange Patil) असा विश्वास शिंदे गटाचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. शिष्टमंडळाला जरांगे पाटील निश्चितच ऐकून समजून घेतील असंही शिरसाट म्हणाले.

Maratha Reservation Issue
संजय शिरसाट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 7:55 PM IST

मुंबई Maratha Reservation Issue : मराठा आरक्षण प्रश्न आणि आंदोलन राज्यभरात अतिशय आक्रमक आणि उग्र होत आहे. आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं असलं तरी आंदोलन हे टोकदार झालं आहे. त्यामुळे सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेऊन राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचा निर्णय घेतला आहे. (Sanjay Shirsat)

जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ : जरांगे पाटील हे दुसऱ्यांदा उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी आतापर्यंत आपण कोणालाही भेटणार नाही. केवळ मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा लिफाफा घेऊन या, अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे सरकारच्या वतीनं कोणीही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला नाही. कारण सरकार टिकणारं आरक्षण देण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र त्यानंतर आता जरांगे पाटील यांनी आपल्याला कोणीही भेटत नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या वतीनं सहा जणांचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी रवाना झालं आहे. धनंजय मुंडे, गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अतुल सावे या मंत्र्यांचा यात समावेश आहे. तर आमदार नारायण कुचे आणि आरोग्य सेलचे प्रमुख मंगेश दिवटे हे भेटीसाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे या शिष्टमंडळानं केलेल्या विनंतीला जरांगे पाटील निश्चित मान देतील आणि ते आपलं उपोषण मागे घेतील. ते सरकारला वेळ देतील अशी अपेक्षा आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे.

पन्नास वर्षांत कुठल्याही सरकारनं आरक्षण दिलं नाही : मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या पन्नास वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र, कुठल्याही सरकारनं आजपर्यंत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं नाही. शिंदे-फडणवीस सरकार आता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी सरकारला थोडा वेळ हवा आहे आणि हा वेळ निश्चितच मराठा समाज आणि आंदोलक देतील अशी अपेक्षा शिरसाट यांनी व्यक्त केली.

हेही वाचा:

  1. Nitesh Rane On Rahul Gandhi : राहुल गांधींनी, मनोज जरांगे पाटील यांना फोन का नाही केला? नितेश राणे यांचा सवाल
  2. All Religions March In Shirdi : जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ शिर्डीत सर्वधर्मीयांचा मोर्चा
  3. All Parties MLAs agitation in Mumbai : सर्वपक्षीय आमदारांचे सलग तिसऱ्या दिवशी मंत्रालयामोर आंदोलन, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.