ETV Bharat / state

All Parties MLAs agitation in Mumbai : सर्वपक्षीय आमदारांचे सलग तिसऱ्या दिवशी मंत्रालयामोर आंदोलन, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात - मंत्रालय रास्ता रोको आमदार आंदोलन

मराठा आरक्षणासाठी राज्यात वातावरण तापलेलं असतानाच सर्वपक्षीय आमदारदेखील आक्रमक झाले आहेत. आमदारांनी मंत्रालयासमोर वाहतूक रोखली आहे.

MLAs agitation in Mumbai
MLAs agitation in Mumbai
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 11:48 AM IST

Updated : Nov 2, 2023, 1:24 PM IST

मुंबई MLAs agitation in Mumbai - सलग तिसऱ्या दिवशी सर्वपक्षीय आमदारांचं मंत्रालयासमोर आंदोलन सुरू आहे. मंत्रालयाबाहेर आमदारांनी वाहतूक रोखली आहे. वानखेडे स्टेडियमबाहेरही आंदोलन करण्याचा निर्णय आमदारांनी घेतला आहे. सर्व आमदारांना रस्त्यातून दूर करत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले, सत्तेत असणारे आमदार आंदोलन करतात, याचा अर्थ सरकारमध्ये संवाद नाही. चर्चा केल्याशिवाय मार्ग निघणार नाही. सरकारनं विशेष अधिवेशन घेऊन त्यात चर्चा करावी. जरांगे यांच्याशी सरकारनं लवकरात लवकर चर्चा करावी, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. जरांगेंनी तब्यतेची काळजी घ्यावी. मराठा आरक्षण मिळावे, अशीही भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली.

शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची काढणार समजूत- मनोज जरांगे पाटील यांचे नवव्या दिवशी आंदोलन सुरू असताना कोंडी फुटलेली नाही. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्याबाबत जरांगे पाटील ठाम आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील मराठा आंदोलक दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज दुपारी अंतरवली सराटी येथे पोहोचणार आहे. या भेटीत शिष्टमंडळाकडून मराठा आरक्षणाबाबतच्या उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच उपोषण मागे घेण्याबाबत जरांगे पाटील यांची समजूत काढण्यात येणार आहे.

गृहमंत्री फडणवीस अमित शाह यांची घेणार भेट- राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापले असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान राज्यातील कायदा - सुव्यवस्था आणि मराठा आरक्षणामुळे चिघळलेल्या परिस्थितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहेत. राज्यात मराठा आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. दुसरीकडं जालना, छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण), बीड या जिल्ह्यांत इंटरनेट बंदी आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड या जिल्ह्यात जमावबंदी आहे. मराठा आंदोलकांना शांततेनं आंदोलन करावे, असे यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं होतं. मात्र, जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असताना मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे.

हेही वाचा-

  1. Maratha Reservation Live Updates: मनोज जरांगे पाटील यांचे नवव्या दिवशी उपोषण सुरूच, राज्य सरकारचे शिष्टमंडळ घेणार भेट
  2. Maratha Reservation : आज तोडगा निघणार? राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज घेणार मनोज जरांगेंची भेट

Last Updated : Nov 2, 2023, 1:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.