ETV Bharat / state

Saraswati Vaidya Murder Case: मनोज साने आणि सरस्वतीने मंदिरात केले होते लग्न; बहिणीचा दावा

author img

By

Published : Jun 9, 2023, 10:44 PM IST

सरस्वतीच्या मनात बहिणीकडे किती दिवस राहायचे असा प्रश्न होता. ती अनाथ असल्याचा फायदा उठवत मनोज साने याने सरस्वती वैद्य हिला माझा 'टू बीएचके फ्लॅट' असून तू तिथे राहा असे सांगितले. त्याप्रमाणे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या पुरुषासोबत सरस्वतीने राहण्यास सुरुवात केली. दरम्यान, आरोपी मनोज साने याने सरस्वती वैद्य हिच्याशी एकत्र राहत असताना शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर मनोज आणि सरस्वतीने मंदिरात लग्न केले असल्याचा दावा सरस्वतीच्या बहिणीने पोलिसांकडे केला आहे.

Saraswati Vaidya Murder Case
बहिणींचा दावा
सरस्वती हत्याकांड प्रकरणी माहिती देताना पोलीस अधिकारी

मुंबई: मीरा रोड येथे सरस्वती वैद्य (३२) या महिलेच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिचा 'लिव्ह इन पार्टनर' मनोज साने याने सरस्वतीची हत्या केल्यानंतर विद्युत करवतीने (इलेक्ट्रीक सॉ) तिच्या शरारीचे तुकडे केले. हे तुकडे नष्ट करण्यासाठी त्याने ते कुकरमध्ये शिजवले आणि गॅसवर भाजले. नंतर ते तुकडे बकेट आणि टबमध्ये ठेवल्याचे पोलिसांना आढळले.

तिला चार बहिणी : सरस्वती वैद्य हिला आणखी चार बहिणी आहेत. त्यापैकी एकीचे निधन झाले असून उरलेल्या तीन बहिणी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे घेण्यासाठी नया नगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यावेळी नया नगर पोलिसांनी या तिन्ही बहिणींचे जबाब नोंदवले असून त्यांच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अशी झाली मनोजसोबत ओळख : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर येथील जानकाबाई आपटे आश्रमात सरस्वती वैद्यसह तिच्या चार बहिणी राहत होत्या. अनाथ आश्रमामध्ये सरस्वती राहात होती. सर्व बहिणी अनाथ आश्रमामध्ये राहायच्या. पाच बहिणींमध्ये सरस्वती धाकटी बहीण होती. अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनाथ आश्रममधून बाहेर पडावे लागते. त्यानुसार पाचही बहिणी आपापल्या मार्गाने बाहेर पडल्या. मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर ती बोरिवली येथे राहण्यास आली. नंतर सरस्वती देखील काही वर्षांनी मोठ्या बहिणीकडे राहण्यास आली. त्यानंतर ती जॉब शोधू लागली. अखेर दुकानात नोकरी शोधत असताना एका रेशनिंगच्या दुकानात सरस्वती वैद्य हिची मनोज साने सोबत ओळख झाली.

बहिणींची होणार 'डीएनए टेस्ट': सरस्वतीच्या आईचे निधन झाले असून वडील आईपासून विभक्त झाले होते. वय लपवण्यासाठी अनाथ आश्रममध्ये काही वाटप करण्यासाठी गेल्यास सरस्वती ही मनोज सानेला माझा मामा आहे असे सांगायची. त्याचप्रमाणे सरस्वतीच्या तिन्ही बहिणींनी सरस्वतीच्या मृतदेहाचे जे तुकडे मिळाले आहेत त्याची मागणी केली आहे. त्यासाठी पोलीस आता तिच्या बहिणींची 'डीएनए टेस्ट' करणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त जयंत बजबुळे यांनी दिली आहे. 'डीएनए टेस्ट' नंतर पोलिसांनी जप्त केलेले सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे तिच्या बहिणींना देणार आहोत, असे पुढे बजबुळे यांनी सांगितले.

हेही वाचा:

  1. Mira Road Murder Case : मनोज सानेने पोलीस चौकशीत दिली धक्कादायक माहिती, पोलीस तपासाला मिळणार वेगळे वळण?
  2. Saraswati Vaidya Murder Case: सरस्वती वैद्य हत्याकांड: 'लिव्ह इन पार्टनर'ला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी
  3. Mira Road Murder: श्रद्धा वालकरपेक्षा भयानक सरस्वती वैद्य हत्याकांड, शंभरहून अधिक तुकडे शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.