ETV Bharat / state

Dr Mangala Gomare : कुटूंब कल्याणाची जबाबदारी महिलांची, या मानसिकतेला छेद देण्याची गरज - डॉ. मंगला गोमारे

राज्य सरकारच्या आदेशाने (observed by order of state government) पुरुष नसबंदी पंधरवडा (Male sterilization fortnight) साजरा केला जात आहे. मात्र मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरातील पुरुषांची मानसिकताही एखाद्या खेड्यातील पुरुषासारखी असल्याचे निदर्शनास आले आहे.

author img

By

Published : Nov 30, 2022, 7:48 PM IST

Male sterilization fortnight
पुरुष नसबंदी पंधरवडा

मुंबई : राज्य सरकारच्या आदेशाने (observed by order of state government) पुरुष नसबंदी पंधरवडा (Male sterilization fortnight) साजरा केला जात आहे. मात्र मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरातील पुरुषांची मानसिकताही एखाद्या खेड्यातील पुरुषासारखी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या पाच वर्षात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेकडे महिला आघाडीवर असून पुरुषांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. मुलांना जन्म देणे आणि कुटूंब कल्याणाचे काम स्त्रियांनी (Womens responsibility for family welfare) करावे, असा एक ग्रह तयार झाला आहे. याला छेद देण्याची गरज (Need to break this mindset) असल्याचे मत मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलतांना व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करतांना डॉ. मंगला गोमारे

महिलांवर सर्व जबाबदारी : देशातील लोकसंख्या वाढीवर उपाय म्हणून २ मुलांनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जातात. भारतीय शिक्षित झाले मात्र त्यानंतरही आजही नियोनाची जबाबदारी बऱ्याचदा स्त्रीयांनाच पार पाडावी लागते. कुटुंब नियोजनात पुरुषाच्या सहभागाला चालना देण्यासाठी २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत पुरुष नसबंदी पंधरवडा साजरा केला जात आहे. या प्रसंगी डॉ. गोमारे बोलत होत्या. यावेळी बोलताना नसबंदी, कुटुंब कल्याण याबाबत पुरुषांकडून गांभीर्याने बघितले जात नाही. महिलांवर सर्व जबाबदारी टाकली जाते. मुलांना जन्म देणे हे काम स्त्रियांचे आहे. तसेच कुटूंब कल्याणाचे कामही स्त्रियांनी करावे, असा एक ग्रह तयार झाला आहे. याला छेद देण्याची गरज आहे. महिलांप्रमाणे पुरुषांनीही नसबंदीमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. नसबंदी एकदम सोपी शस्त्रक्रिया आहे. त्यासाठी ऍडमिट होण्याची गरज नाही. ओपीडी मध्ये प्राथमिक तपासणी करून दोन तासात घरी पाठवेल जाते. स्त्रियांची नसबंदी करताना त्यांना ऍडमिट व्हावे लागते. अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात असे डॉ. गोमारे म्हणाल्या.

पुरुषांनी पुढे यावे : गेल्या पाच वर्षात कुटुंब कल्याणासाठी ज्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या, त्यामधील पुरुषांचे प्रमाण नगण्य असे आहे. यावर बोलताना पुरुषांनी पुढे यावे म्हणून हा पंधरवडा साजरा केला जातो. नसबंदी करणाऱ्या पुरुषांना १४५१ रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो. प्रवर्तकांना २०० रुपये दिले जातात. यंदा २८४ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे. या पंधरवड्यात आणखी ११ ते १२ पुरुषांनी नसबंदी करू घेतली आहे. आता पर्यंत सुमारे ३०० पुरुषांनी शस्त्रक्रिया करून घेतली आहे, अशी माहिती डॉ. गोमारे यांनी दिली.

शस्त्रक्रियेकडे पुरुषांची पाठ : २०१७ - १८ मध्ये २१ हजार ६६४ नसबंदीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी ९१४ पुरुषांच्या तर २० हजार ७५० महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. २०१८ - १९ मध्ये १९ हजार ४४८ नसबंदीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी १८५ पुरुषांच्या तर १९ हजार २६३ महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. २०१९ - २० मध्ये १७ हजार ७१५ नसबंदीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी ११६ पुरुषांच्या तर १७ हजार ६५९ महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. २०२० - २१ मध्ये ११ हजार ८५४ नसबंदीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी ४९ पुरुषांच्या तर ११ हजार ८०५ महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. २०२१ - २२ मध्ये १२ हजार १८१ नसबंदीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी ४३ पुरुषांच्या तर १२ हजार १३८ महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गेल्या ५ वर्षात एकूण ८२ हजार ९२२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी १३०७ पुरुषांनी तर ८१ हजार ६१५ महिलांनी नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.