ETV Bharat / state

MVA Morcha : परवानगी दिली नाही तरी 17 डिसेंबरला मोर्चा निघणारच; महाविकास आघाडीचा निर्धार - महाविकास आघाडी बैठक

महापुरुषांच्या वक्तव्याप्रकरणी महाविकास आघाडीने ( Mahavikas Aghadi) 17 डिसेंबरला (17 December Mahamorcha) महामोर्चाचे (Mahavikas Aghadi Mahamorcha) आयोजन केले आहे. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition leader Ajit Pawar) यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. राज्य सरकारने परवानगी नाही दिली तरी हा मोर्चा निघणारच आहे, असा निर्धार आजच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी (Mahavikas Aghadi Mahamorcha 17 December) केला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 15, 2022, 7:34 PM IST

मुंबई - 17 डिसेंबरला होणाऱ्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Mahamorcha) मोर्चाबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. महापुरुषांबाबत केली जाणारी वादग्रस्त (Controversial Statement) वक्तव्य, कर्नाटक महाराष्ट्र सीमा मुद्दा (Border Dispute) आणि महाराष्ट्रात वाढणारी बेरोजगारी, भ्रष्टाचार यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा हा मोर्चा आहे. केवळ महाविकास आघाडीच नाही तर सर्व महाराष्ट्रप्रेमींनी या मोर्चामध्ये सामील व्हावे, असे आवाहन या बैठकीनंतर अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच हा मोर्चा निघणारच आहे, असा निर्धार या बैठकीत केला आहे.

महाविकास आघाडीचे नेते हजर - या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत, सुभाष देसाई, पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप, रईस शेख, प्रकाश रेड्डी हे सर्व नेते उपस्थित होते.

मोर्चाला परवानगी मिळेल अशी आशा - महाविकास आघाडीकडून होणाऱ्या या मोर्चाला अद्याप प परवानगी मिळालेली नाही. मात्र, या मोर्चाच्या कायदेशीर परवानगीसाठी महाविकास आघाडीचे नेते प्रयत्न करत आहेत. आम्हाला आशा आहे की नक्कीच आम्हाला परवानगी मिळेल, असे मत बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. मात्र, यासोबतच जरी राज्य सरकारने परवानगी दिली नाही तरी हा मोर्चा निघेलच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच हा मोर्चा अत्यंत शांततेच्या मार्गाने निघणार असून, या मोर्चासाठी मुंबईसह पुणे, नाशिक, नवी मुंबईतून मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होणार आहेत. या मोर्चाला कोणतेही वेगळं वळण लागू नये यासाठी आजच्या बैठकीत चर्चा झाली त्या माध्यमातून आज योजना देखील तयार करण्यात आली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे ट्विटर हँडल हॅक होणे गंभीर - कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे ट्विटर हँडल हॅक झाल्याचे सांगण्यात आले. असे असले तर हे गंभीर प्रकरण आहे. यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून केली.

हेही वाचा - Mahavikas Aghadi Mahamorcha : महाविकास आघाडीचे 17 डिसेंबरला महामोर्चाचे आयोजन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.