ETV Bharat / state

August Kranti Din : काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वातंत्र्यवीरांना अभिवादन; तर महात्मा गांधींचे पणतू मुंबई पोलिसांच्या ताब्यात - Tushar Gandhi In Mumbai Police Custody

ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाकडून स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्यात आले. काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनात महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले. गांधीजींनी देशाला संबोधित करताना 'करो या मरो' चे आवाहन केले होते. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार असलेल्या ऑगस्ट क्रांती मैदान येथे स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या सर्व स्वातंत्र्यवीरांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाकडून अभिवादन करण्यात आले.

August Kranti Din
काँग्रेस पक्षाकडून स्वातंत्र्यवीरांना अभिवादन
author img

By

Published : Aug 9, 2023, 4:20 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ऑगस्ट क्रांती मैदानावर स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले. आज सकाळी ऑगस्ट क्रांती मैदानात स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जात असताना महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना पोलिसांनी अडवले. त्या काळी लढा हा इंग्रजांविरोधात होता, आज लढा लोकशाहीची खिल्ली उडवणाऱ्या स्वकियांसोबत आहे. या लढाईत आम्ही मागे हटणार नाही, असे ते म्हणाले.

अकार्यक्षमता झाकण्याचा प्रकार : इंग्रजांच्या विरोधामध्ये महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा दिला होता. आम्हाला विश्वास आहे की, भारत हा स्वातंत्र्यवादी लोकशाहीवादी देश आहे. देशाला जेव्हा जेव्हा कोणी धक्का पोचवायचे काम करेल तेव्हा देशवासीय एकत्र येतील. त्यासाठी हे प्रेरणास्थान असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी क्रांतिवीरांच्या स्मृतीस्तंभास अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. आसामचे मुख्यमंत्र्यांनी मणिपूरच्या घटनेमागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला. यावर जयंत पाटील म्हणाले की, त्यांना काय करायला पाहिजे हे समजत नसावे. कारण मणिपूर शांत राखण्यास तेथील मुख्यमंत्र्यांना अपयश येत आहे. मणिपूरचे कार्यक्षम मुख्यमंत्री राहिले नाही.

आत्तापर्यंत पाहिलं नाही : संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या दिल्लीत सुरू आहे. सभागृहामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या शब्दप्रयोगाबद्दल देखील जयंत पाटील म्हणाले की, ही बाब खूप गंभीर आहे. अशाप्रकारे बोलले जाते असे आम्ही कधी बघितले नाही. हा अशोभनीय प्रकार आहे. यावरुन विचारसरणी कशी आहे याचा प्रत्यय देशातील जनतेसमोर पुन्हा एकदा आला असल्याचा टोला त्यांनी लागावला आहे.

काँग्रेस पक्षाकडून अभिवादन : काँग्रेसतर्फे क्रांतिवीरांच्या स्मृतिस्तंभास वंदन करून क्रांतीविरांना अभिवादन करण्यात आले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झालेल्या भारतीय स्वातंत्र्याचा साक्षीदार राहिलेल्या तेजपाल हॉल येथील प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी काँग्रेसचे प्रमुख नेते, आजी-माजी आमदार, खासदार, नगरसेवक, सामाजिक संस्था, स्वातंत्र्य सैनिक, मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

इतिहास रिपीट झाला का : गिरगावपासून ते स्मारकापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तेजपाल हॉलमध्ये सर्व स्वातंत्र्यसैनिकांची बैठक झाली होती. आजच्या दिवशी भारत छोडो हा नारा येथे देण्यात आला होता. याच दिवशी महात्मा गांधी यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर लोकांनी जनआंदोलन उभे केले. आज तो इतिहास पुन्हा रिपीट झाला आहे. कारण महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना ताब्यात घेतले, त्यांची रॅली ही पहिल्यांदा निघत नव्हती. प्रत्येकवर्षी रॅली निघत असते. सरकारच्या वतीने हा पहिल्यांदा कार्यक्रम होत आहे. तुम्हाला जर स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहायची असेल तर तुम्ही मनोहर कुलकर्णीला अटक करा. जे लोक महापुरुष आणि राष्ट्रध्वजाबद्दल अपशब्द बोलतात त्यांना पोलीस संरक्षण आणि जे लोक शांततेच्या मार्गाने आंदोलन करतात त्यांना पोलिसांनी जी वागणूक दिली ती संतापजनक असल्याचे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -

  1. International Day Of Worlds Indigenous People 2023 : जागतिक आदिवासी दिन का करण्यात येतो साजरा? काय आहे महत्व आणि इतिहास
  2. August Kranti Din: साताऱ्याच्या कॉम्रेडने केलेल्या चित्रिकरणामुळे ऑगस्ट क्रांतीच्या आठवणी आजही जिवंत
  3. Rahul Gandhi in Parliament Updates :आम्ही शौचालयावर बोलतो, तेव्हा काँग्रेसचे खासदार हसतात- स्मृती इराणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.